आयफोन १३ हे अ‍ॅपल कंपनीने फ्लॅगशिप मॉडेल आहे. आयफोन १३ हे कंपनीचे तसे जुने मॉडेल आहे. कारण त्यानंतर आयफोन १४ आणि १५ सिरीज लॉन्च झाली आहे. आयफोन १३ हा फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये सर्वाधिक विक्री होणार आयफोन होता. आयफोन १५ सिरीज लॉन्च झाल्यानंतर कंपनीने आयफोन १३ ची किंमत कमी केली आहे. आयफोन १३ कंपनीच्या अधिकृत स्टोअरवर आयफोन १३ सर्वात स्वस्त किंमतीत उपलब्ध आहे. आयफोन १३ हा फोन २०२१ मध्ये ७९,९०० रुपयांच्या सुरुवातीसह किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. सध्या हा आयफोन १३ हा फोन कंपनीच्या अधिकृत स्टोअरवर ५९,९०० रुपयांच्या कमी किंमतीत उपलब्ध आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयफोन १३ : फीचर्स

आयफोन १३ मध्ये वेगळ्या प्रकारचे रिअर कॅमेरा डिझाइन सादर केले होते. हे डिझाइन कंपनी अजूनही आपल्या फोनमध्ये वापरत आहेत. जर का तुम्ही एखादा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आयफोन १३ स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

हेही वाचा : सॅमसंग Galaxy Z Flip5 शी स्पर्धा करणाऱ्या ओप्पोच्या ‘या’ फोनच्या सेलला भारतात आजपासून सुरूवात; जाणून घ्या

आयफोन १३ मध्ये ४ के डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह १२ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये कंपनीने वापरकर्त्यांना नाइट मोडसह १२ मेगापिक्सलचा ट्रू डेप्थ फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. या फोन या फोनमध्ये १७ तासांचा व्हिडीओ प्ले बॅक ऑफर करते. आयफोन १३ आणि आयफोन १४ मध्ये एकसारखेच फीचर्स देण्यात आले आहेत.

आयफोन १३ हा फोन २०२१ मध्ये ७९,९०० रुपयांच्या सुरुवातीसह किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. सध्या हा आयफोन १३ हा फोन कंपनीच्या अधिकृत स्टोअरवर ५९,९०० रुपयांच्या कमी किंमतीत उपलब्ध आहे. तथापि, आयफोन १३ ला फ्लिपकार्टवरून ११,५९९ रुपयांच्या कमी किंमतीत खरेदी करू शकता. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल संपला असून , फ्लिपकार्टने आता दसरा स्पेशल सेलची घोषणा केली आहे. आयफोन १३ फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ४०,४०० रुपयांच्या डिस्काउंटसह केवळ ११,५९९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

आयफोन १३ फ्लिपकार्टवर ७,९०१ रुपयांच्या डिस्काउंटसह ५१,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय खरेदीदारांना कोटक, आरबीएल बँकेच्या क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास १,२५० रुपयांची सूट मिळू शकते. यामुळे आयफोन १३ ची किंमत ५०,७४९ रुपयांपर्यंत कमी होते. याशिवाय खरेदीदारांना आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास ३९,१५० रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. म्हणजेच सर्व बँक ऑफर्स आणि डिस्काउंट ऑफर पाहिल्यास खरेदीदारांना आयफोन १३ हा फ्लिपकार्टच्या सेलमधून केवळ ११,५९९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphon13 buy 11599 rs on flipkart dussehra sale 40400 rs discount check alll offers tmb 01