आपल्या प्रत्येकालाच असे वाटत असते की आपल्याकडे देखील Apple कंपनीचा आयफोन असावा. तसेच अनेक जणांचे स्वप्न ते पूर्णदेखील करतात. मात्र आता वापरकर्त्यांना iPhone 12 स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. Flipkart या ई-कॉमर्स वेबसाईटवर या फोनवर डिस्काउंट मिळत आहे. तर या फोनवर फ्लिपकार्टवर कोणकोणत्या ऑफर्स मिळत आहेत याबाबदल जाणून घेऊयात. Apple कंपनी या वर्षात आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च करण्याची शक्यता आहे. ही सिरीज लॉन्च झाल्यानंतर कंपनी आयफोन १२ बंद करणार आहे. आयफोन १२ हा कंपनीद्वारे विकल्या जाणार्‍या सर्वात स्वस्त स्मार्टफोनपैकी एक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयफोन १२ मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले मिळतो. हूड अंतर्गत आयफोनमध्ये A14 बायोनिक चिपचे सपोर्ट मिळते. हा फोन सिरॅमिक शिल्ड आणि IP68 वॉटर रेझिस्टन्ससह येतो. कॅमेऱ्याचा विचार केल्यास डिव्हाइसला मागील बाजूस १२ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये नाईट मोड, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह १२ मेगापिक्सलचा TrueDepth फ्रंट कॅमेरा देखील मिळतो. व्हर्टिकल ड्युअल कॅमेरा आणि ६४ जीबी स्टोरेज असणारा कंपनीचा हा शेवटचा फोन आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

हेही वाचा : Amazon Great Freedom Festival sale 2023: ‘या’ आयफोनवर मिळणार भरघोस डिस्काउंट; इतर प्रॉडक्ट्सवरील ऑफर्स पहाच

Apple आपली आयफोन १५ सिरीज लवकरच लॉन्च करणार आहे. यासाठी काही आठवडे शिल्लक आहेत. आगामी आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो, आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश असेल.

आयफोन १२ वरील ऑफर्स

सध्या आयफोन १२ हा कंपनीच्या अधिकृत ऑनलाईन स्टोअरवर ५९,९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तथापि Apple फ्लॅगशिप फ्लिपकार्टवर ५३,९९९ रुपयांमध्ये याची किरकोळ विक्री करत आहे. फ्लिपकार्टवरून आयफोन १२ खरेदी करताना खरेदीदारांना Axix बँकेच्या कार्डवर ५ टक्के कॅशबॅक मिळू शकतो. यामुळे या फोनची किंमत ५१,३०० रुपये इतकी होईल. फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या फोनच्या बदलीवर ३८,६०० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. अनेक बँक ऑफर्स आणि डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर ४१,२९९ रुपयांच्या डिस्काउंटनंतर आयफोन १२ खरेदीदार फक्त १२,७०० रुपयांना खरेदी करू शकतात.