अॅप्पलने अलिकडेच आपली आयफोन १४ सिरीज लाँच केली होती. त्यानंतर १४ खालील मॉडेल्सच्या किंमतीमध्ये सूट मिळत असल्याचे दिसून आले आहे. ही आयफोनच्या चाहत्यांसाठी नक्कीच सुवर्ण संधी आहे. केवळ इतकेच नव्हे तर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये या फोनची किंमती आणखी कमी होण्याच्या चर्चा होत्या. दरम्यान बिग बिलियन डे उद्यापासून सुरू होणार असून यात अॅप्पल १२ मिनी हा फोन मोठ्या ऑफरसह मिळणार आहे.
iPhone 12 Mini सेलमध्ये ३५ हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. हा फोन सध्या ५५ हजार ३६९ रुपयांमध्ये विकला जात आहे. या स्मार्टफोनला ६९ हजार ९०० रुपयांमध्ये लाँच करण्यात आले होते. त्यामुळे आयफोन १२ मिनीवर ग्राहकांची ५० टक्के बचत होणार असल्याचे समजते. ग्राहकांना अर्ध्या किंमतीत हा फोन उपलब्ध होणार आहे.
iPhone 12 Mini चे फीचर
आयफोन १२ मिनीमध्ये ५.४ इंचचा सूपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनला मागे १२ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तसेच सेल्फीसाठी देखील फोनच्या पुढील भागात १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. अॅप्पलचे कॅमेऱ्याची क्लिआरिटी आणि छायाचित्रांची गुणवत्ता चांगली असल्याचे अॅप्पलचे चाहते सांगतात.
जोरदार कामगिरीसाठी फोनमध्ये A14 बायोनिक चिपसेट आहे. फोनच्या सुरक्षेसाठी त्याला सिरॅमिक शिल्ड मिळाली आहे, तसेच फोनला ip68 रेटींग आहे. फोन ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजच्या पर्यायासह उपलब्ध आहे. आयफोन १२ मिनी पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. निळा, हिरवा, पांढरा, लाल आणि काळ्या रांगामध्ये हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.