आयफोन आपल्याकडे असावा असं प्रत्येक तरुणाची इच्छा असते. पण या फोनची किंमत पाहता इच्छांना आवर घालावी लागते. पण काही स्किममधून आवडता आयफोन स्वस्त मिळू शकतो. जर तुम्हाला आयफोन १३ घ्यायचा असेल आणि तुमचं बजेट कमी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. इंडिया आयस्टोरद्वारे तुम्हाल आयफोन स्वस्तात मिळेल. आयपोन १३ ज्याची किंमत १२८ जीबी व्हेरियंटसाठी ७९,९०० रुपये आहे. हा फोन आयस्टोरवर ५०,९०० रुपयांना मिळत आहे. आयस्टोर हे अॅप्पलचे अधिकृत स्टोअर देखील आहे. आयफोन १३ हा सप्टेंबर २०२१ रोजी भारतात लाँच करण्यात आला. आयफोन १३ मालिकेत आयफोन १३, आयफोन १३ प्रो, आयफोन १३ प्रो मॅक्सचा समावेश आहे. आयफोन या वर्षी म्हणजेच २०२२ रोजी आयफोन १४ लाँच करणार आहे. पण लाँचिंग अजूनही दूर असल्याने आयफोन १३ खरेदीसाठी योग्य वेळ आहे.
आयफोन १३ १२८ जीबी व्हेरिएंटसाठीआयस्टोरवरून ५०,९०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. आयफोन १३ १२८ जीबीची किंमत रु. 79,900 आहे. परंतु आयस्टोर ५ हजार रुपयांचा फ्लॅट स्टोअर डिस्काउंट आणि ६ हजार कॅशबॅक देत आहे. आयसीआयसीआय बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड, कोटक बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि एसबीआय क्रेडिट कार्डांसह बॅक कार्डवर कॅशबॅक ऑफर दिलं जात आहे. त्याचबरोबर एक्सचेंज बोनस ऑफर करत आहे. तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात १८ हजार रुपयांची सवलत मिळेल. जर तुम्ही आयफोन एक्सआर, आयफोन ११ किंवा आयफोन १२ वापरत असाल. तर ही सूट मिळेल. फोनच्या स्थितीवर मूल्य अवलंबून आहे. जर फोन खराब असेल तर ही रक्कम कमी होईल.
आयफोन १३ ची किंमत आणि ऑफर्स समजून घ्या
- आयफोन १३ (१२८ जीबी) व्हेरिएंटची किंमत – ७९,९०० रुपये
- आयस्टोरवरील सवलत- ५,००० रुपये
- बँक ऑफर आणि कॅशबॅक- ६,००० रुपये
- वरील सूट मिळाल्यानंतर आयफोन १३ किंमत- ६८,९०० रुपये
- जुना फोन एक्सचेंज केल्यास सवलत- १८,००० रुपये
- आता आयफोन १३ (१२८ जीबी) व्हेरिएंटची किंमत- ५०,९०० रुपये
ही ऑफर फक्त आयफोन १३ च्या १२८ जीबी व्हेरिएंटशिवाय २५६ जीबी, ५१२ जीबीवरही लागू आहे. २५६ जीबी फोनची किंमत ८९,९०० रुपये आहे. सर्व सवलती घेतल्यास ही किंमत ६०,९०० रुपये होते. तसेच ५१२ जीबी फोनची किंमत ८०,९०० रुपये आहे. सर्व सवलती घेतल्यास ही किंमत ८०,९०० रुपये होईल. इंडिया आयस्टोर व्यतिरिक्त हा फोन Aptronixindia, FutureWorld आणि MyImagineStore यासह स्टोअरमध्ये देखील ही सवलत उपलब्ध आहे