Apple कंपनीचा iPhone 13 ला फ्लिपकार्ट विक्रीदरम्यान खरेदीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेला सर्वात मूल्यवान स्मार्टफोन आहे. काउंटरपॉईंटच्या रिपोर्टनुसार २०२२ मध्ये भारतात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन होता. आयफोन १३ मध्ये diagonal रिअर कॅमेऱ्याचे डिझाइन सादर केले होते. ज्याचे अनुसरण कंपनी अजूनही करत आहे. जर का तुम्ही प्रीमियम फ्लॅगशिप लेव्हल डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे योग्य बजेट असेल तर आयफोन १३ हा सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.

आयफोन १३ मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. तो डिस्प्ले कंपनीच्या फ्लॅगशिप A15 बायोनिक चिपसेटद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह १२ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात नाईट मोडसह १२ मेगापिक्सलचा TrueDepth फ्रंट कॅमेरा देखील मिळतो. हे डिव्हाइस १७ तासांपर्यंत व्हिडीओ प्ले बॅक देते असा कंपनीचा दावा आहे. हे अगदी कमी किंमतीमध्ये आयफोन १४ सारखेच सेप्सिफिकेशन्स ऑफर करते. जर का तुम्ही तुमच्या बजेटमध्ये एक प्रीमियम आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा एक योग्य पर्याय आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
onion shortage Mumbai
शंभरी गाठलेल्या कांद्यामुळे ग्राहक जेरीस, जाणून घ्या, शेतकऱ्यांना किती दर मिळतो, ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतात
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन

हेही वाचा : टेक्स्ट आणि व्हॉईस मेसेजप्रमाणेच आता WhatsApp वर पाठवता येणार व्हिडीओ मेसेज, लॉन्च झाले ‘हे’ फिचर

काय आहे ऑफर ?

२०२१ मध्ये आयफोन १३ प्रो आणि मिनीसह ७९,९०० रुपयांच्या किंमतीमध्ये लॉन्च केला गेला होता. सध्या फ्लिपकार्टवर आयफोन १३ वर ४८,५०१ रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा फोन फ्लिपकार्टवर २१,२९९ रुपयांना उपलब्ध आहे. आयफोन १३ हा फ्लिपकार्टवर ७,९०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर ६१,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय खरेदीदार HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या EMI व्यवहारांवर २००० रुपयांचा डिस्काउंट मिळवू शकतात. यामुळे आयफोन १३ ची किंमत ५९,९९९ रुपये झाली आहे. याशिवाय खरेदीदार आपले जुने स्मार्टफोनच्या बदल्यात ३६,८०० रुपयांचा डिस्काउंट मिळवू शकतात. या सर्व बँक ऑफर्स आणि डिस्काउंट ऑफर्स नंतर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आयफोन १३ ची किंमत २१,३९९ रुपये झाली आहे. म्हणजेच तुम्ही केवळ २१,३९९ रुपयांमध्ये आयफोन १३ खरेदी करू शकता.

आयफोन १५ च्या लॉन्चिंगची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही आहे. मात्र याच वर्षांमध्ये आयफोन १५ लॉन्च होईल. त्यामुळे पुढील जनरेशनमधील आयफोन सप्टेंबर महिन्यात लॉन्च होईल अशी शक्यता आहे. Apple १२ सप्टेंबरच्या आसपास कधीतरी आयफोन १५ सीरिजचे लॉन्चिंग करू शकतो. तसेच काही दिवसानंतर हे मॉडेल जगभर खरेदीसाठी उपलब्ध होईल. दरवर्षीप्रमाणे Apple चा इव्हेंट क्युपर्टिनो येथील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये होऊ शकतो.