अॅपल प्रेमी भारतीय ग्राहकांसाठी खुशखबर आहे. तुम्ही iPhone 13 खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. iPhone 13 च्या किमतीत मोठी कपात झाली आहे. Apple iPhone 13 फ्लिपकार्ट, अॅमेझाॅन वर नुकत्याच झालेल्या सणासुदीच्या सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध करून देण्यात आला होता. पण आता फेस्टिव्ह विक्री संपली असली तरी सुध्दा अॅपलचा हा 5G फोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. तुम्ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि अॅपल स्टोअरवरून कमी किमतीत iPhone 13 खरेदी करू शकता. जाणून घेऊया Apple iPhone 13 वरील सवलतीबद्दल…
iPhone 13 च्या किमतीत जबरदस्त कपात
फ्लिपकार्टवर iPhone 13 ची किंमत
१२८ जीबी स्टोरेजसह iPhone 13 चा बेस व्हेरिएंट फ्लिपकार्टवरून ६६,९९० रुपयांना खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफरसह, तुम्हाला या iPhone वर १८,५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय, फ्लिपकार्टवर अनेक बँक ऑफर आहेत, ज्याद्वारे तुम्हाला iPhone 13 अधिक स्वस्तात मिळेल. सुरक्षित पॅकेजिंगसाठी फ्लिपकार्ट २९ रुपये आकारत आहे.
आणखी वाचा : येत्या वर्षात बटण नसलेला आयफोन बाजारपेठेत दाखल होणार; काय आहे अॅपलची नवी योजना, जाणून घ्या सविस्तर…
अॅमेझाॅनवर iPhone 13 ची किंमत
आयफोन 13 चा बेस व्हेरिएंट अॅमेझाॅनवर ६६,९९० रुपयांना लिस्ट झाला आहे. अॅमेझाॅन इंडियावर एक्सचेंज ऑफरमध्ये हँडसेट घेण्याचीही संधी आहे.फ्लिपकार्टप्रमाणे, अॅमेझाॅनवर निवडक बँकांचे क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून देखील कॅशबॅक मिळू शकतो. तर, दुसरीकडे, Apple Store सारख्या इतर प्लॅटफॉर्मबद्दल बोलायचे झाल्यास, Apple iPhone 13 ६९,९९० रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे. तथापि, वापरकर्ते अॅपलच्या ट्रेड-इन प्रोग्राममध्ये रु. २,२०० ते रु. ५८,७३० पर्यंत सूट घेऊ शकतात. ही सूट तुमच्या स्मार्टफोनच्या स्थितीवर अवलंबून असते.
iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स
– iPhone 13 मध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले.
– A15 बायोनिक चिपसेट वर काम करतो.
– फोटोग्राफीसाठी ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप.
– १२ एमपी चा प्रायमरी सेंसर.
– १२ एमपी अल्ट्रा वाइड लेंस उपलब्ध.
– १२ एमपी चा फ्रंट कॅमेरा.
– स्टारलाइट, मिडनाइट, ब्लू, पिंक आणि रेड कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध.