Flipkart ही एक ई-कॉमर्स वेबसाईट आहे. सध्या फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग्स डेज सेल सुरू आहे. १५ ते १९ जुलै दरम्यान सुरू असलेला सेल १९ जुलै म्हणजेच आज संपणार आहे. सध्या या सेलमध्ये अनेक वस्तूंवर ऑफर्स ग्राहकांना मिळत आहेत. आज संपणाऱ्या फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपल iPhone 14 वर मोठा डिस्काउंट मिळत आहे. कमी किंमतीमध्ये आयफोन १४ खरेदी करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. कारण आयफोन १४ ४७,५१० रुपयांच्या मोठ्या डिस्काउंटनंतर ३२,३९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
आयफोन 14 कंपनीच्या सध्याच्या फ्लॅगशिप लाइनअपमधील व्हॅनिला फोन आहे ज्यामध्ये iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांचाही समावेश आहे. आयफोन १४ मध्ये आयफोन १३ प्रमाणेच चिपसेटचा सपोर्ट येतो. यात आयफोन १३ सारखा ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. ज्यात व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. रिअर कॅमेऱ्यामध्ये १२ मेगापिक्सलच्या सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप येतो. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
हेही वाचा : Facebook ने लॉन्च केले भन्नाट फिचर; व्हिडीओ अपलोड आणि एडिट करणे होणार सोपे
जर का तुम्ही आयफोन १४ खरेदी करण्याचा विचार करत असाल ही चांगली संधी आहे. कारण आयफोन १४ हा ४७,५०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर केवळ ३२,३९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन १४ सध्या अधिकृत स्टोअरवर १०,९० रुपयांच्या सूटसह ६८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या शिवाय खरेदीदारांना Axix Bank आणि Citi Bank यांच्या क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर १,००० रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो.
या सर्व ऑफर्समुळे फोनची किंमत ६७,९९९ रुपयांपर्यंत कमी झाली आहे. याशिवाय तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात फ्लिपकार्ट ३५,६०० रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. याचा अर्थ सर्व बँक ऑफर आणि डिस्काउंटनंतर आयफोन १४ ४७,५०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवर ३२,९९९ मध्ये उपलब्ध असणार आहे.