Apple कंपनीचा नुकताच Wanderlust इव्हेंट कॅलिफोर्निया येथे पार पडला. हा इव्हेंट १२ सप्टेंबर रोजी झाला होता. या इव्हेंटमध्ये कंपनीने आपली बहुप्रतीक्षित अशी iPhone 15 सिरीज लॉन्च केली आहे. ज्यात आयफोन १५, आयफोन १५ प्लस तसेच आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. नवीन सिरीजमध्ये कंपनीने बरेच अपडेट्स दिले आहेत. नवीन सिरीज लॉन्च केल्यांनतर दिग्गज टेक कंपनी असणाऱ्या Apple गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लस या स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंपनीने 2022 मधील सर्वात लोकप्रिय आयफोन्सची किंमत १० हजार रुपयांनी कमी केली आहे. नवीन किंमती आता Apple.in वर दिसून येत आहे. थोडक्यात आयफोन १५ सिरीज लॉन्च झाल्यानंतर आयफोन १४ सिरीजमधील आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लसच्या किंमती कमी झाल्या आहेत. या दोन्ही मॉडेल्सच्या किंमती किती रुपयांनी कमी झाल्या आहेत आणि यामधील फीचर्स कोणकोणते आहेत ते जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त timesofindia ने दिले आहे.

हेही वाचा : फोटोग्राफर्ससाठी खुशखबर! २०० मेगापिक्सलच्या जबरदस्त कॅमेऱ्यासह Honor चा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लॉन्च

आयफोन १४ व १४ प्लसच्या जुन्या व आताच्या नवीन किंमती पाहुयात.

आयफोन १४ ची जुनी किंमतआयफोन १४ ची नवीन किंमत
१२८ जीबी – ७९,९०० रुपये १२८ जीबी – ६९,९०० रुपये
२५६ जीबी – ८९,९०० रुपये २५६ जीबी – ७९,९०० रुपये
५१२ जीबी – १,०९,९०० रुपये ५१२ जीबी – ९९,९०० रुपये

आयफोन 14 प्लस

आयफोन 14 प्लस ची जुनी किंमतआयफोन 14 प्लस ची नवीन किंमत
१२८ जीबी – ८९,९०० रुपये १२८ जीबी – ७९,९०० रुपये
२५६ जीबी – ९९,९०० रुपये २५६ जीबी – ८९,९०० रुपये
५१२ जीबी – १,१९,९०० रुपये ५१२ जीबी – १,०९,९०० रुपये

हेही वाचा : iPhone 15 Series: भारतात आयफोनचे प्रो मॉडेल्स नॉन प्रो पेक्षा महागडे का असतात? जाणून घ्या

फीचर्स

आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लसमध्ये वापरकर्त्यांना अनुक्रमे ६.१ आणि ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळतो. आयफोन १४ आणि १४ प्लसमध्ये फास्ट अपर्चरसह १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. तसेच यामध्ये १२ इंचाचा अल्ट्रा वाइड सेन्सर देखील मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. त्यात महत्वाचे म्हणजे हा कॅमेरा ऑटोफोकस करतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphone 14 and 14 pllus 10000 price cut after iphone 15 series luanch in india check details tmb 01