फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल २०२३ नुकताच संपला आहे. या सेलमध्ये आयफोन १४ आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होता. मात्र त्या सेलमध्ये तुम्हाला आयफोन १४ खरेदी करता येऊ शकला नसेल तर, सध्या तुम्ही आयफोन १४ मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. आयफोन १४ मागील वर्षी आयफोन १४ प्लस , आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्स या मॉडेल्ससह लॉन्च करण्यात आला होता. मागील वर्षी आयफोन १४ हा ७९,९०० रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. Apple स्टोअर सध्या या फोनची विक्री ६९,९०० रुपयांमध्ये करत आहे. तर आयफोन १४ फ्लिपकार्टवर केवळ २०,८४९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना कशी मिळू शकते याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
iPhone 14: फीचर्स
आयफोन १३ प्रमाणेच समानता असल्यामुळे आयफोन १४ मॉडल लॉन्च झाल्यानंतर लगेचच छाप पाडण्यात अयशस्वी झाले. आयफोन १४ मध्ये आयफोन १३ प्रमाणेच चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये आयफोन १३ प्रमाणेच नॉचसह ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो. ज्यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तसेच रिअर कॅमेरा हा १२ मेगापिक्सलचा सेन्सरआणि ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
मागील वर्षी आयफोन १४ हा ७९,९०० रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. आयफोन १५ सिरीज लॉन्च केल्यानंतर कंपनीने आयफोन १४ च्या किंमतीमध्ये घट केली आहे. सध्या या फोनची किंमत कंपनीच्या अधिकृत स्टोअरवर ६९,९०० रुपये इतकी आहे. तथापि, आयफोन १४ फ्लिपकार्टवर केवळ २०,८४९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. आयफोन १४ या फोनवर ४१,१५० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
आयफोन १४ फ्लिपकार्टवर सध्या ६१,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या अधिकृत स्टोअरपेक्षा हा फोन फ्लिपकार्टवर ७,९०१ रुपयांच्या कमी किंमतीती उपलब्ध आहे. जर का तुम्ही हा फोन खरेदी करताना बँक ऑफ बडोदाचे क्रेडिट कार्ड वापरले तर तुम्हाला ईएमआय व्यवहारांवर २ हजारांचा डिस्काउंट मिळू शकतो. याशिवाय फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात तुम्हाला ३९१,५० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. सर्व ऑफर्स आणि डिस्काउंटचा विचार केल्यास आयफोन १४ तुम्हाला फ्लिपकार्टवरून केवळ २०,८४९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.