Amazon प्राईम डे सेल २०२३ आजपासून सुरू झाला आहे. १५ जुलै (आज) पासून आणि उद्या १६ जुलै पर्यंत सुरू असणार आहे. हा सेल सर्व प्राईम मेंबर्ससाठी लाईव्ह झाला आहे. हा सेल केवळ प्राईम मेंबर्ससाठीच उपलब्ध असणार आहे. या सेलची कल्पना नवीन प्राईम ग्राहकांना आकर्षित करणे हाच आहे. amazon विविध वस्तूंवर डिस्काउंट आणि चांगल्या डिल्स ऑफर करत आहे. निवडक प्रॉडक्ट्सवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत.

Amazon प्राईम डे सेल दरम्यान काही प्रॉडक्ट्सवर नो-कोस्ट EMI चा पर्याय उपलब्ध असणार आहे. नवीन आयफोन, मॅकबुक किंवा आयपॅड खरेदी करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी इथे Apple प्रॉडक्ट्सची एक लिस्ट आहे. कोणत्या प्रॉडक्टवर किती डिस्काउंट मिळणार आहे. तसेच कॅशबॅक , एक्सचेंज ऑफर आहे. हे आपण जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Game Changer vs Fateh Box Office Collection Day 1
‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर
Vaikuntha Ekadashi Vrat
Vaikuntha Ekadashi 2025: गूगलवर ट्रेंड होतेय २०२५ मधील पहिली एकादशी; जाणून घ्या एकादशीचा शुभ मुहूर्त आणि तिथी

हेही वाचा : Amazon Prime Day sale 2023: वनप्लस Nord 3 सह ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळणार डिस्काउंट, ऑफर्स एकदा पहाच

iPhone 14

iPhone 14 लाइनअप सप्टेंबर २०२२ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. तसेच बेस मॉडेल हे ब्लू, मिडनाईट, पर्पल, (Product) लाल, स्टारलाईट आणि यलो यासारख्या विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन १४ च्या १२८ जीबी सत्तोरेज व्हेरिएंटची किंमत ७९,९९० रूपये आहे. त्याशिवाय, प्राईम डे सेल दरम्यान Apple चा हँडसेट कमी किंमतीमध्ये म्हणजे ६५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन A15 Bionic SoC द्वारे समर्थित आहे . यामध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले मिळतो. यामध्ये एलईडी फ्लॅश युनिटसह १२ मेगापिक्सलचे सेन्सर असलेले दोन ड्युअल कॅमेरा युनिट आहेत. सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

MacBook Air 2020 M1

MacBook Air 2020 ला M1 चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये १३.३ इंचाचा LED बॅकलिट IPS डिस्प्ले २,५६०x१,६०० पिक्सल आणि 227ppi च्या पिक्सेल घनतेसह येतो. हा लॅपटॉप ३०W यूएसबी टाईप-सी चार्जिंगला सपोर्ट करतो. एकदा चार्ज केल्यास १८ तासांपर्यंत व्हिडीओ प्ले बॅक टाइम देतो. मॅकबुक गोल्ड, सिल्व्हर आणि स्पेस ग्रे कलर या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. प्राईम डे सेल दरम्यान MacBook Air 2020 M1 ८१,९९० रुपये या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. याची लॉन्चिंग किंमत हि ९२,९०० रुपये आहे. ३,१९७ रुपयांपासून EMI पर्याय सुरू होतो.

Apple Watch Series 8

Apple Watch Series सप्टेंबर २०२२ म्ध्येयें लॉन्च करण्यात आली होती. सिरीज ८ मध्ये नेहमी ऑन-डिस्प्ले (AoD) सुविधा असून, हे ४१ मिमी आणि ४५ मिमी डायल आकारामध्ये उपलब्ध आहेत. ४१ मिमी व्हेरिएंटची किंमत ४५,९०० रुपये आहे. २०२३ च्या प्राईम डे सेलमध्ये ते ३२,९९० रुपयांच्या सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच जवळ जवळ यावर ग्राहकांना १२,९१० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

Story img Loader