Apple कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली iPhone 15 सिरिज लॅान्च केली आहे. २२ तारखेपासून आयफोन १५ सिरीजची विक्री सुरू झाली आहे. या सिरीजमध्ये आयफोन १५,आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. आयफोन १५ सिरिज खरेदी करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे. मात्र ज्या ग्राहकांना आयफोन १४ खरेदी करायचा आहे. ते फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलची वाट बघत आहेत. सध्या आयफोन १४ हा फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करण्याची संधी खरेदीदारांना उपलब्ध असणार आहे. तर कोणकोणत्या ऑफर्स आणि डिस्काउंट आयफोन १४ च्या खरेदीवर मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
आयफोन १४ ही Apple कंपनीची मागील वर्षी लॉन्च केलेली सिरीज आहे. आयफोन १४ प्लसमध्ये ६.७ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले वापरकर्त्यांना मिळतो. या स्मार्टफोनमध्ये एक चांगल्या A15 बायोनिक चिपचा सपोर्ट देण्यात आला आहे. या चिपचा सपोर्ट आयफोन १३ सिरीजमध्ये देखील देण्यात आला होता. या बाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
आयफोन १४ प्लसच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक अल्ट्रा वाइड सेन्सर देण्यात आला आहे. थोडक्यात या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. आयफोन १४ प्लसमध्ये ५जी सपोर्ट मिळतो. हा स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यास २६ तास चालू शकतो असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये नवीन क्रॅश डिटेक्शन फीचरचा सपोर्ट मिळतो.
काय आहेत ऑफर्स ?
आयफोन १५ सिरीज लॉन्च झाल्यानंतर आयफोन १४ च्या किंमतीमध्ये १० हजार रुपयांची घट केली आहे. तथापि, तुम्हाला फ्लिपकार्टवर आयफोन १४ प्लस ४३,९९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्टवर ग्राहकांना ३६,५०१ रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. भारतात आयफोन १४ प्लसच्या १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या बेस मॉडेलची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरु होते. या स्मार्टफोनच्या २५६ जीबी स्टोरेज आणि ५१२ जीबी स्टोरेज असणाऱ्या या मॉडेल्सची किंमत अनुक्रमे ८९,९०० रुपये आणि १,०९,९०० रुपये आहे. आयफोन १४ प्लस फ्लिपकार्ट सेलमध्ये ५,९०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर ७३,९९९ रुपयांमध्ये लिस्टेड आहे.