iPhone 14 Plus अखेर ७ ऑक्टोबरपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. आयफोन १४ सिरीजची याआधीच विक्री सुरू झाली होती. त्यापैकी एकमेव आयफोन १४ प्लसची विक्री सप्टेंबर २०२२ मध्ये देशात सुरू झाली नव्हती. आयफोन १४ प्लस मधील बहुतांश वैशिष्ट्ये आयफोन १४ प्रमाणेच आहेत. दोन फोनमधील फरक फक्त डिस्प्लेचा आकार आणि बॅटरीचे आयुष्य आहे. Apple iPhone 14 Plus स्मार्टफोन A15 Bionic चिपसेट सह येतो. ऍपलच्या या नवीन आयफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स याबद्दल सर्व काही सांगूया…

भारतात iPhone 14 Plus ची किंमत

iPhone 14 Plus Apple India च्या ऑनलाइन स्टोअर, Flipkart आणि Amazon वरून खरेदी केला जाऊ शकतो . हा फोन १२८ जीबी, २५६ जीबी, आणि ५१२ जीबी स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. त्यांची किंमत ८९,००० रुपये ९९,९०० रुपये आणि १,१९,९०० रुपये आहे. Apple चा स्मार्टफोन ब्लू, मिडनाईट, पर्पल, स्टारलाईट आणि प्रॉडक्ट रेड कलर मध्ये घेतला जाऊ शकतो.

iPhone SE 4 launch Tomorrow
iPhone SE4 : २० तासांच्या बॅटरी लाईफसह स्वस्तात मस्त iPhone येतोय बाजारात! असतील ‘हे’ जबरदस्त फीचर्स
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Google Pixel 9a Feature And Launch Date
Google Pixel 9a खरेदी करणाऱ्यांना ‘या’ ॲपचे मिळणार फ्री सब्स्क्रिप्शन; कधी होणार लाँच? घ्या जाणून…
Mobile phone tariff declined 94 pc since 2014 says Jyotiraditya
मोबाईल फोन सेवांचे दर देशात सर्वाधिक कमी; इतकी स्वस्त झाली सेवा
Treatment options for Smartphone vision syndrome
Smartphone vision syndrome: तुम्हीही मोबाईलवर सतत स्क्रोल करत असता का? मग होऊ शकतो स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम; वाचा लक्षणे आणि उपाय
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती ( छायाचित्र - लोकसत्ता टीम )
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
central government raised purchase price of ethanol from C heavy molasses to Rs 57 97 per liter from Rs 56 58
इथेनॉल खरेदीच्या दरवाढीचे गाजर जाणून घ्या, केंद्र सरकारच्या निर्णयावर साखर उद्योग नाराज का
How much sugar has been produced in Maharashtra and how much will be produced Mumbai print news
राज्याने साखर उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला; जाणून घ्या, साखर उत्पादन किती झाले, किती होणार 

( ही ही वाचा: अनेक वापरकर्त्यांना मिळू लागते 5G सिग्नल आणि स्क्रीनवर दिसला ‘5G’! लवकर फोनमधील ‘ही’ नेटवर्क सेटिंग्ज बदला)

iPhone 14 Plus वैशिष्ट्य

आयफोन १४ प्लस मध्ये (1284×2778 पिक्सेल) रिझोल्यूशनसह ७.७ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. आयफोन १४ प्लस स्मार्टफोन बनवण्यासाठी, समोरच्या बाजूला सिरॅमिक शील्डसह अॅल्युमिनियम डिझाइन उपलब्ध आहे. या फोनमध्ये फोन ग्लास बॅक पॅनेलसह येतो. हँडसेट धूळ आणि पाण्याच्या संरक्षणासाठी IP68 रेटिंगसह येतो.

आयफोन १४ प्लस मध्ये A15 Bionic चिपसेट देण्यात आला आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, आयफोन १४ प्लस मध्ये १२ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये TrueDepth कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेर्‍यांसह, ६०fps वर ४k पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाऊ शकते.

( हे ही वाचा: Earn Money Online: एक रुपयाही न गुंतवता घरी बसून कमवता येतील हजारो रुपये; जाणून घ्या काय आहे मार्ग)

आयफोन १४ प्लस स्मार्टफोन iOS १६ वर चालतो. बायोमेट्रिक पर्याय म्हणून, त्यात फेसआयडी वैशिष्ट्य उपलब्ध देखील आहे. या स्मार्टफोनची बॅटरी एका पूर्ण चार्जवर २६ तासांपर्यंत व्हिडिओ प्लेटाइम देऊ शकते असा दावा apple ने केला आहे. आयफोन १४ प्लस २० वोल्टपेक्षा जास्त वायर्ड चार्जिंग आणि १५वोल्ट MagSafe वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. हा फोन ७.८mm पातळ आहे आणि या फोनचे वजन सुमारे २०३ ग्रॅम आहे.

Story img Loader