अ‍ॅपल ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये अ‍ॅपलने आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये आयफोन १५,आयफोन १५प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. ही सिरीज लॉन्च झाल्यानंतर कंपनीने आयफोन १४ पोर मॉडेल बंद केले आहे. मात्र सध्या हा फोन फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तर फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये आयफोन १४ प्रो खरेदीदारांना स्वस्तात कसा खरेदी करता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.

iPhone 14 Pro: फीचर्स

डायनॅमिक आयर्लंड आणि ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असणारा आयफोन १४ प्रो हा कंपनीचे पहिले आयफोन मॉडेल होते. आयफोन १४ पेक्षा खरेदीदारांचा जास्त प्रतिसाद हा आयफोन १४ प्रो ला मिळाला. आयफोन १४ प्रो हा कंपनीचा पहिला नॉचलेस फोन आहे. यामध्ये A16 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे. आयफोन १४ प्रो ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. आयफोन १५ सिरीज लॉन्च केल्यानंतर कंपनीने आयफोन १४ प्रो हे मॉडेल बंद केले आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Parents who give nylon manja to their children are also facing action by nashik police
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात
Image Of Tim Cook Apple CEO
Apple CEO Salary : टिम कूक यांच्या पगारात घसघशीत वाढ, २०२४ मध्ये अ‍ॅपल कंपनीकडून मिळाले ६४३ कोटी रुपये
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”

हेही वाचा : शक्तिशाली चिपसेटसह १२ डिसेंबर रोजी लॉन्च होणार iQOO कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन; फीचर्स एकदा पाहाच

जर का तुम्ही आयफोन १४ प्रो खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला या फोनवर फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये आकर्षक डिस्काउंट मिळणार आहे. फ्लिपकार्टवर आयफोन १४ प्रो या फोनवर ४२,५०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ४२,५०० रुपयांच्या डिस्काउंटमुळे आयफोन १४ प्रो फ्लिपकार्टवर ८६,४०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

आयफोन १४ प्रो मागील वर्षी १,२९,९०० रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. तर २५६ जीबी स्टोरेज असलेला आयफोन १४ प्रो फ्लिपकार्टवर १,२९,९९९ रुपयांमध्ये लिस्टेड करण्यात आला आहे. तसेच फ्लिपकार्टवर तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर ४२ हजारांचा डिस्काउंट मिळू शकतो. याशिवाय एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर १,५०० रुपयांची सूट मिळू शकते. म्हणजेच सर्व डिस्काउंट आणि बँक ऑफर्ससह तुम्हाला आयफोन १४ प्रो वर ४२,५०० रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला आयफोन १४ प्रो हे मॉडेल फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये ८६,४०० रुपयांचा खरेदी करता येऊ शकतो.

Story img Loader