iPhone 15 या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित असा स्मार्टफोन आहे. लवकरच iPhone 15 लॉन्च होणार आहे. अधिकृत लॉन्चिंगआधी आगामी iPhone 15 मॉडेल्सबद्दल विशेषतः iPhone 15 बद्दल बरेच बोलले गेले आहे. कारण हा स्मार्टफोन सिरीजमधील सर्वात स्वस्त असेल आणि बाकीच्यांपेक्षा अधिक आकर्षक असू शकतो.आयफोन १५ बद्दल इंटरनेटवर बऱ्याच अफवा आणि माहिती लीक होत असल्याने एखाद्या व्यक्तीचा गोंधळ होणे स्वाभाविक आहे. आज आपण आयफोन १५ बद्दल माहिती असलेल्या सर्व गोष्टी एकाच संकलित केल्या गेल्या आहेत. अपेक्षित किंमत,फीचर्स याबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

iPhone 15 : अपेक्षित लॉन्चिंग डेट

आयफोन १५ च्या लॉन्चिंगची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही आहे. मात्र याच वर्षांमध्ये आयफोन १५ लॉन्च होईल. त्यामुळे पुढील जनरेशनमधील आयफोन सप्टेंबर महिन्यात लॉन्च होईल अशी शक्यता आहे. Apple १२ सप्टेंबरच्या आसपास कधीतरी आयफोन १५ सीरिजचे लॉन्चिंग करू शकतो. तसेच काही दिवसानंतर हे मॉडेल जगभर खरेदीसाठी उपलब्ध होईल. दरवर्षीप्रमाणे Apple चा इव्हेंट क्युपर्टिनो येथील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये होऊ शकतो. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

हेही वाचा : Tech Tips: भारतात पासवर्ड शेअरिंग बंद, आता Netflix हाऊसहोल्ड अकाउंट कसे सेट करायचे? जाणून घ्या…

iPhone 15 : अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्समध्ये फार कोणताही फार बदल झालेला नाही. आयफोन १५ मध्ये ६.१ इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. तथापि सध्या काही रिपोर्ट सूचित करतात की या वर्षातील सर्व आयफोन मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड स्टाइलचा डिस्प्ले असेल जो सध्या प्रो मॉडेल्सपुरता मर्यादित आहे. कार्यक्षमतेच्या बाबतीत आयफोन १५ खूप अपग्रेडेड व्हर्जन असल्याचे सांगितले जात आहे. ज्या अफवा समोर येत आहेत त्यानुसार आगामी आयफोन १५ हा A16 बायोनिक चिपसेटद्वारे समर्थित असल्याचे म्हटले जाते.

आयफोन १५ च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये मोठे अपडेट मिळण्याची शक्यता आहे. अफवांनुसार आयफोन १५ मध्ये ४८ मेगापिक्सलच्या इमेज सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सिस्टीम ऑफर करेल.जे मागील जनरेशनच्या आयफोन मॉडेलच्या १२ मेगापिक्सलच्या कॅमेरा सेन्सरपेक्षा निश्चितच एक मोठे अपग्रेड असू शकते. तसेच येत असलेल्या अफवांनुसार आयफोन १५ त्याच्या पूर्वीच्या तुलनेत चांगली बॅटरी लाइफ देईल. आयफोन १४ ची बॅटरी पूर्ण एक दिवस टिकते. आयफोन १५ देखील चांगला बॅटरी बॅकअप मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : लवकरच ‘या’ युजर्ससाठी लॉन्च होणार ChatGpt अ‍ॅप, या निर्णयामुळे गुगल बार्डचे टेन्शन वाढणार?

iPhone 15 : भारतातील अपेक्षित किंमत

समोर येत असलेल्या अफवा आणि काही रिपोर्टनुसार आयफोन १५ ची भारतातील किंमत ८०,००० असू शकते. मात्र कंपनी आयफोन १५ ची किंमत वाढवण्याची शक्यता आहे. कारण कंपनी यामध्ये चांगला बॅटरी बॅकअप, नवीन चिपसेट आणि नवीन कॅमेरा मॉड्यूल ऑफर करण्याची शक्यता आहे. मात्र अधिकृत किंमतीसाठी Apple च्या घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphone 15 launch date india price expected features new chipset and battery check all details tmb 01
Show comments