अॅपल कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमधील मॉडेल्समध्ये कंपनीने यंदा काही नवीन फीचर्स दिले आहेत. या सिरीजमध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस , आयफोन १५ ५प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. या मॉडेल्सची विक्री भारतासह सर्वत्र सुरु आहे. आयफोन १५ सिरिज लॉन्च झाल्यानंतर आयफोन १५ प्लसच्या मागणीत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. मागील वर्षी आयफोन १४ प्लस लॉन्च करण्यात आला होता. मात्र या फोनला ग्राहकांचा म्हणावा तास प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता आयफोन १५ प्लसच्या बाबतीत असे नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आयफोन १५ प्लस हा फोन फ्लिपकार्टवर कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्राहकांना हा फोन स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो. तर हा फोन कसा कमी किंमतीत कसा खरेदी करता येणार आहे, ते जाणून घेऊयात.
आयफोन १५ प्लसमध्ये डायनॅमिक आयर्लंडसह स्लिम बेझल्स आणि नॉचलेस डिझाइन मिळते. फोनच्या मधील बाजूस थोडीशी कॅमेरा लेन्स मिळते. तसेच आयफोन १५ प्लस मध्ये चार्जिंगसाठी यूएसबी-सी पोर्ट देखील देण्यात आले आहे. आयफोन १५ सिरीजमधील मॉडेल्समधील फोनमध्ये कॅमेऱ्याचे मोठे अपडेट देण्यात आले आहे. आयफोन १५ प्लसमध्ये आयफोन १४ प्रो मॅक्स प्रमाणेच ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळतो. या ४८ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याला १२ मेगापिक्सलचा दुसऱ्या सेन्सरचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
ऑफर्स
आयफोन १५ प्लसमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यूएसबी सी पोर्ट, नवीन चिपसेट आणि अन्य फीचर्स देण्यात आले आहेत. आयफोन १५ प्लसच्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची भारतातील किंमत ८९,९०० रुपये आहे. सध्या फ्लिपकार्ट तुम्हाला ४१,१५० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. म्हणजेच हा फोन तुम्हाला केवळ ४८,७५० रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.
सध्या आयफोन १५ फ्लिपकार्टवर ८९,९०० रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन खरेदी करणाऱ्यांना बँक ऑफ बडोदा बँकेच्या कार्डने ईएमआय व्यवहार केल्यास तुम्हाला २ हजारांचा डिस्काउंट मिळू शकतो. यामुळे आयफोन १५ प्लसची किंमत ८७,९०० रुपये इतकी होते. याशिवाय फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर ३९,१५० रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. यामुळे आयफोन १५ प्लसची किंमत ४८,७५० रुपये इतकी कमी होते. यामुळे तुम्हाला आयफोन १५ प्लस केवळ ४८,७५० रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.