ॲपल ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. कंपनीचे अनेक प्रॉडक्ट्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कंपनी आयफोन, स्मार्टफोन, आयपॅड टॅब्लेट कॉम्प्युटर, मॅक पर्सनल कॉम्प्युटर, आयपॉड पोर्टेबल मीडिया प्लेअरचेदेखील उत्पादन करते. आयफोन कंपनीची आयफोन १५ सीरिज सप्टेंबरमध्ये भारतात लाँच (iPhone 15 Series) करण्यात आली होती, ज्याची किंमत ७९,९००० रुपये एवढी आहे. तर आता हा आयफोन भारतात सवलतीच्या दरात खरेदीसाठी उपलब्ध आहे.
तर आयफोन प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती समोर येत आहे. ई-कॉमर्स साइट काही निवडक बँक कार्ड आणि इएमआय व्यवहार वापरून ४,००० रुपयांच्या सवलतीसह आयफोन १५ ऑफर करीत आहे. तसेच या ऑफरमध्ये अतिरिक्त एक्स्चेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्यायसुद्धा उपल्बध आहेत. डायनॅमिक इसलँड आणि ४८ मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा युनिट तसेच आयपी६८ रेटिंग धूळ आणि पाण्यापासून स्मार्टफोनचे संरक्षण करते.
फ्लिपकार्टने आयफोन १५ चे बेस १२८जीबी (iPhone 15) स्टोरेज वेरिएंट ७३,९९९ रुपयांना उपल्बध आहे. तसेच ई-कॉमर्स वेबसाइट एचडीएफसी डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि ईएमआयसह खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ४,००० रुपये कॅशबॅक देते आहे. यामुळे आयफोन १५ची किंमत ६९,९९९ रुपयांपर्यंत या ऑफरमध्ये घसरू शकते. तसेच आयफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही नो-कॉस्ट ईएमआय पर्याय निवडत असाल तर तुम्हाला १२,३३४ प्रति महिना भरावे लागणार .
हेही वाचा…अतिशय महत्त्वाचे आहेत Gmail चे ‘नऊ’ फीचर्स; तुम्हाला माहिती आहेत का ?
ॲपल इंडिया वेबसाइट आणि ॲमेझॉन सध्या आयफोन १५ चे बेस व्हेरिएंट ७९,९०० रुपयांना विकत आहेत. हा आयफोन १५, १२८जीबी, २५६जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेज पर्यायांमध्ये उपल्बध आहे. तसेच काळा, निळा, हिरवा, गुलाबी आणि पिवळ्या शेडमध्ये हा स्मार्टफोन ऑफर केला जातो. २५८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ८३,९९९ आणि ५१२ जीबी व्हेरिएंट १,०३,९९९ रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
फिचर्स आणि बरंच काही :
ॲपलने १३ सप्टेंबर रोजी ‘Wonderlust event’ दरम्यान आयफोन १५ सीरिज लाँच केली, त्यात आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स आदींचा समावेश आहे. आयफोन १५ मध्ये सिरेमिक शील्ड (Ceramic Shield) संरक्षणासह 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. यात डायनॅमिक आयलंडचे फिचर आहे, जे पाणी आणि धूळ यापासून संरक्षण करण्यासाठी आयपी६८ (IP68) रेटिंग केलेलं आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ; ज्यामध्ये ४८ मेगापिक्सलचा वाइड-एंगल कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. तर, सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा TrueDepth कॅमेरा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयफोन १५ मध्ये सी-टाईप चार्जिंग पोर्ट देण्यात आलं आहे