फ्लिपकार्ट ही एक लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट आहे. यावरून तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू आकर्षक डिस्काउंटसह किंवा विशिष्ठ ऑफरमध्ये खरेदी करू शकता. सध्या आयफोन १५ प्रो हे मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. आयफोन हे अ‍ॅपल कंपनीचे उत्पादन आहे. सप्टेंबर महिन्यात आयफोन १५ सिरीज अ‍ॅपलने लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस,आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. तर आज आपण आयफोन १५ प्रो हे मॉडेल फ्लिपकार्टवर स्वस्तात कसे खरेदी करता येऊ शकते, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयफोन १५ प्रो हा एक प्रगत स्मार्टफोन आहे. आयफोन १५ प्रो मागच्या महिन्यात लॉन्च झाला आहे. आयफोन १५ प्रो आपल्या आधीच्या सिरीजमधील मॉडेलपेक्षा अधिक वेगळा आहे. या फोनमध्ये टायटॅनियम चेसिस, यूएसबी-सी पोर्ट, अ‍ॅक्शन बटण आणि अन्य नवीन अपडेट्स देण्यात आले आहेत. आयफोन १५ प्रो भारतात १,३४,९०० रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. सध्या फ्लिपकार्टवर ग्राहकांना ९३,७५० रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. आयफोन १५ प्रो वर ४१,१५० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

हेही वाचा : Samsung ने लॉन्च केला १५ हजारांपेक्षा कमी किंमतीमधील ‘हा’ स्मार्टफोन; ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मिळणार…

आयफोन १५ प्रो फ्लिपकार्टवर १,३४,९०० रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच हा फोन खरेदी करणाऱ्यांना बँक ऑफ बडोदाच्या खरेदी कार्डच्या ईएमआय व्यवहारांवर २ हजारांचा डिस्काउंट मिळू शकतो. यामुळे आयफोन १५ प्रो ची किंमत १,३२,९०० रुपये इतकी होते. याशिवाय, फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात तुम्हाला ३९,१५० रुपयांचा डिस्काउंट देऊ शकतो. याचाच अर्थ सर्व बँक ऑफर्स आणि डिस्काउंटसह तुम्हाला आयफोन १५ प्रो फ्लिपकार्टवर ४१,१५० रुपयांच्या डिस्काउंटनंतर ९३,७५० रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphone 15 pro buy 93750 on flipkart disocunt on 41150 rs check offers tmb 01