Apple कंपनीने १२ सप्टेंबरला आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये आयफोन ५, आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स अशा चार मॉडेल्सचा समावेश आहे. २२ तारखेपासून या फोन्सची विक्री सूर होणार आहे. या मधील आयफोन १५ प्रो मॅक्स हा आयफोन हाय एंड व्हेरिएंट म्हणून लॉन्च झाला आहे. यामध्ये ६.७ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन १५ प्रो मॅक्सची जी किंमत आहे त्याच तुलनेत सॅमसंग कंपनीने फेब्रुवारी महिन्यात आपला Galaxy S23 Ultra लॉन्च केला आहे. यामध्ये ६.८ इंचाचा एज QHD+ डायनामिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये दोन्ही कंपन्या १ टीबी इतके स्टोरेज ऑफर करते.

Apple ने आयफोन १५ प्रो मॅक्स लॉन्च केला आहे. यामधील फीचर्स,किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची तुलना आपण सॅमसंग Galaxy S23 Ultra बरोबर करणार आहोत. जे सारख्याच किंमतीत हाय स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले गेले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्समधील तुलना जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”

हेही वाचा : फोटोग्राफर्ससाठी खुशखबर! २०० मेगापिक्सलच्या जबरदस्त कॅमेऱ्यासह Honor चा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लॉन्च

आयफोन १५ Pro Max Vs सॅमसंग गॅलॅक्सी S23 Ultra : स्पेसिफिकेशन्स

आयफोन १५ प्रो मॅक्स मध्ये खरेदीदारांना ६.७ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा पीक ब्राइटनेस हा २००० नीट्स इतका आहे. हा फोन कंपनीच्या नवीन ३ एनएम चिपसेट A17 Pro SoC द्वारे समर्थित आहे. तर दुसरकडे गॅलॅक्सी एस २३ अल्ट्रा मध्ये ६.८ उंचच एज QHD+ डायनॅमिक AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. या फोंनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन 2 SoC च्या व्हर्जनचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन UI 5.1 सह अँड्रॉइड १३ वर चालतो.

सॅमसंगच्या Galaxy S23 Ultra मध्ये एक क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी वाइड कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, १० मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि १० मेगापिक्सलचा टेलीफोटो शूटर देखील मिळतो. तर दुरीकडे आयफोन १५ प्रो मॅक्स मध्ये एक क्वाड कॅमेरा सेटअप वापरकर्त्यांना मिळणार आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलच्छ वाइड अँगल कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा 3x टेलीफोटो कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेरा मिळतो. तसेच यात सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा ट्रू डेप्थ कॅमेरा मिळतो.

हेही वाचा : Poco च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट; जाणून घ्या हा फोन खरेदी करण्याची ४ कारणे

बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास नुकताच लॉन्च झालेल्या आयफोन १५ प्रो मॅक्स मध्ये यावर्षी यूएसबी टाइप- सी पोर्ट देण्यात आले आहे. आयफोन १५ प्रो मॅक्स मध्ये २४ तासांपेक्षा जास्त बॅटरी लाइफ मिळते असा कंपनीने दावा केला आहे. दुसरीकडे Galaxy S23 Ultra ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. ज्याला ४५ W वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

आयफोन १५ Pro Max Vs सॅमसंग गॅलॅक्सी S23 Ultra : किंमत

आयफोन १५ प्रो मॅक्स २२ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोन हा ब्लॅक टायटॅनियम, ब्ल्यू टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम आणि व्हाइट टायटॅनियम व्हेरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. आयफोन १५ प्रो मॅक्स २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,५,९०० रुपये ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,७९,९०० रुपये आणि १ टीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १,९९,९०० रुपये असणार आहे.

दुसरीकडे सॅमसंग Galaxy S23 Ultra च्या १२ जीबीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १,२४,९०० रुपये आहे. तर ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,३४,९०० रुपये आणि १ टीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,५४,९९९ रुपये आहे हा स्मार्टफोन फँटम ब्लॅक, क्रीम ग्रीन, लव्हेंडर रेड, ग्रेफाइम, लाइम आणि स्काय ब्ल्यू रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.