अ‍ॅपल कंपनीने आयफोन १५ सिरीज काही दिवसांपूर्वी लॉन्च केली आहे. २२ तारखेपासून आयफोन १५ सिरीजची विक्री सुरू झाली आहे. आयफोन १५ सिरीजची विक्री भारतात देखील सुरू झाली आहे. आयफोन १५ सिरीजमधील बेस मॉडेलची किंमत ७९,९०० रुपये तर आयफोन १५ प्रो ची किंमत १,३४,९०० रुपयांपासून सुरु होते. किंमत जास्त असून देखील आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या मॉडेल्सना जास्त मागणी आहे. अनेक वेबसाइट्स आयफोन १५ च्या खरेदीवर डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स देत आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात.

Apple ऑफिशियल स्टोअर

जर का तुम्ही मुंबई किंवा असाल तर तुम्ही तेथील Apple च्या अधिकृत स्टोअरमध्ये जाऊन आयफोन १५ सिरीजमधील तुम्हाला हवे असलेले मॉडेल्स खरेदी करू शकता. कंपनी सध्या HDFC बँकेच्या ग्राहकांना ६ हजारांचा डिस्काउंट देत आहे. ज्यामुळे आयफोनची किंमत अजून कमी होते. याशिवाय खरेदीदार आयफोन एक्सचेंज करू शकतात. तुम्ही कंपनीच्या अधिकृत स्टोअरमधून आणि अधिकृत वेबसाइटवरून आयफोन खरेदी करू शकता. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

Devadoot Nidhi activity helps friends financially by encouraging mutual participation and support in times of need
सामाजिक भान देणारा ‘देवदूत निधी’
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
Loan App Harassment
Loan App Scam: दोन हजारांच्या कर्जासाठी पत्नीचे फोटो मॉर्फ करत व्हायरल केले, लोन App च्या छळवणुकीला कंटाळून पतीची आत्महत्या
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?

हेही वाचा : Flipkart Big Billion Days 2023: इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सवर मिळणार ८० टक्के डिस्काउंट; कधीपासून सुरू होणार सेल?

Amazon

आयफोन १५ खरेदी करण्यासाठी Amazon इंडिया हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. प्राइम वापरकर्ते २४ तासांच्या आतमध्ये आपल्या नवीन आयफोनची डिलिव्हरी मिळवू शकतात. Amazon आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्ही डिव्हाइसेससाठी अतिरिक्त डिस्काउंट ऑफर करतो.

Flipkart

नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट देखील एक चांगला पर्याय आहे. फ्लिपकार्ट Amazon प्रमाणेच अतिरिक्त बँक ऑफर्स ऑफर करते. तसेच तुम्ही फ्लिपकार्टवरून आयफोन खरेदी करत असताना कमीत कमी ३०० सुपरकॉइन कमवू शकता. जे प्लॅटफॉर्मवर इतर वस्तू खरेदी करताना रिडिम केले जाऊ शकतात.

हेही वाचा : iPhone 15 खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ ठिकाणी सुरू आहेत बेस्ट ऑफर्स; एकदा पाहाच

Blinkit

ब्लिंकिंट वेबसाइट मुंबई,दिल्ली आणि बंगळुरूसारख्या निवडक शहरांमध्ये आयफोन १५ सिरीजची विक्री करते. केवळ १० मिनिटांमध्ये नवीन आयफोन १५ देण्याचा दावा वेगळेपण दर्शवते. ब्लिंकिंट प्रीमियम अधिकृत पुर्नविक्रेता युनिकॉर्नच्या मदतीने बँक डिस्काउंट पण ऑफर करत आहे.

Apple चे अधिकृत पुनर्विक्रेते

तुम्ही देशातील कोणत्याही Apple कंपनीच्या अधिकृत रिसेलरकडून नवीन आयफोन १५ खरेदी करू शकता. यामध्ये युनिकॉर्न, Imagine, इंडिया स्टोअर, विजय सेल्सस, रिलायन्स डिजिटल आणि टाटा क्रोमा यांसारख्या स्टोअर्सचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी आयफोन खरेदीवर असणारी ऑफर्स आणि मिळणार डिस्काउंट वेगवेगळा असू शकतो. त्याबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्टोअर्सशी संपर्क साधणे आवश्यक आहे हे लक्षात घेणे गरजचे आहे.

Story img Loader