Apple कंपनीने काल झालेल्या आपल्या Wonderlust इव्हेंटमध्ये आयफोन १५ सिरीजचे लॉन्चिंग केले आहे. आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५, आयफोन प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ पारो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. विक्री २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भारत, अमेरिका आणि हॉंगकॉंग सारख्या बाजारपेठांमध्ये आयफोन १५ च्या किंमतींमध्ये मोठा फरक आहे. विशेषतः हाय एंड प्रो मॉडेलसह जे आता भारतात आपल्या आधीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक महाग झाले आहेत.

Apple कंपनीने अमेरिकेमध्ये आयफोन १५ प्रो च्या किंमतीत वाढ झाल्याच्या अफवा धुडकावून लावल्या आहेत. तथापि, भारतात आयफोन १५ प्रो च्या किंमतीमध्ये ५ हजारांची वाढ झाली आहे. तर आयफोन १५ प्रो मॅक्सची किंमत २० हजारांनी वाढली आहे. आयफोन १५ प्रो मॅक्स कंपनीने लॉन्च केलेला सर्वात महागडा आयफोन आहे. ज्यामध्ये १ टीबी स्टोरेज मिळते व त्याची किंमत जवळपास २ लाख रुपये आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

dubai visa policy
दुबईचा व्हिसा मिळवताना भारतीय पर्यटकांना अडचणी का येत आहेत? काय आहेत नवे नियम?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
indians arrested on canada us border
४०,००० हून अधिक भारतीयांना अटक; अमेरिका-कॅनडा सीमेवर बेकायदा मार्गाने घुसखोरी वाढली, कारण काय?
Suzuki Swift Special Edition Launched In Thailand, Features Pink-Purple Gradient Colour
स्विफ्टची स्पेशल एडिशन मार्केटमध्ये लाँच; नजर हटणार नाही असा लूक; पाहा किंमत आणि जबरदस्त फीचर्स
Honda launches new Amaze
Honda Amaze : अपडेटेड सेडानचे ऑफलाइन बुकिंग सुरू; ४५ दिवसांपर्यंत फक्त १० लाख रुपयांपर्यंत करा खरेदी; पण फीचर्स काय असणार?
vodafone sells 3 percent stake in indus tower
व्होडाफोनकडून इंडसमधील ३ टक्के हिस्सा विक्री

हेही वाचा : २९ तासांचा प्ले बॅक टाइम व ‘या’ फीचर्ससह भारतात लॉन्च झाले iPhone 15 Pro आणि Pro मॅक्स; किंमत…

आयफोन १५ सिरीजच्या भारतासह इतर देशांमधील किंमती जाणून घेऊयात.

iPhone 15
iPhone 15 Plus
iPhone 15 Pro
iPhone 15 Pro Max

भारत७९,९०० रुपये८९,९०० रुपये१,३४,९०० रुपये१,५९,९०० रुपये
अमेरिका७९९ डॉलर्स८९९ डॉलर्स९९९ डॉलर्स१,११९ डॉलर्स
भारतीय रुपयांमधील किंमत६६,२०८ रुपये७४,४९५ रुपये९९,३५४ रुपये९९,३५४ रुपये
इंग्लंड७९९ डॉलर्स ८९९ डॉलर्स ९९९ डॉलर्स १,१९९ डॉलर्स
भारतीय रुपयांमधील किंमत८२,७७० रुपये ९३,१२९ रुपये १,०३,४८८रुपये १,२४,२०६रुपये
दुबई AED ३,३९९AED ३,७९९AED ४,२९९AED ५,०९९
भारतीय रुपयांमधील किंमत७६,६८७ रुपये ८५,७१२ रुपये ९६,९९३ रुपये १,१५,०४३ रुपये
चीनRMB ५,९९९RMB ६,९९९RMB ७,९९९RMB ८,९९९
भारतीय रुपयांमधील किंमत६९,१२४ रुपये ८०,६४६ रुपये ९२,१६९ रुपये १,१५,२१४ रुपये
हाँगकाँगHK$ ६,८९९
HK$ ७,६९९HK$ ८,५९९HK$ १०,१९९
भारतीय रुपयांमधील किंमत७३,०६२ रुपये ८१,५३५ रुपये ९१,०६६ रुपये १,०८,११० रुपये
व्हिएतनामVND २२,९९९,०००VND २५,९९९,०००VND २८,९९९,०००VND ३४,९९९,०००
भारतीय रुपयांमधील किंमत७९,०४७ रुपये ८९,३५८ रुपये ९९,६६९ रुपये रुपये १,२०,२६९
सिंगापूरS$ १,२९९S$ १,४९९S$ १,६४९S$ १,९९९९
भारतीय रुपयांमधील किंमत७९,०८९ रुपये ८८,२२२ रुपये १,००,३९९ रुपये १,२१,७०९ रुपये
थायलंड฿ ३२,९००฿ ३७,९००฿ ४१,९००฿ ४८,९००
भारतीय रुपयांमधील किंमत७६,४७२ रुपये ८८,०९४ रुपये ९७,३९२ रुपये १,१३,६६२ रुपये
फ्रान्स € ९६९€ १,११९€ १,२२९€ १,४७९
भारतीय रुपयांमधील किंमत८६,३५५ रुपये रुपये ९९,७२३रुपये १,०९,५२६रुपये १,३१,८०५
जपान१,२४,८०० Yen१,३९,८०० Yen१,५९,८०० Yen१,८९,८०० Yen
भारतीय रुपयांमधील किंमत७०,००७रुपये ७८,६७३ रुपये ८९,९२९ रुपये १,०६,८११ रुपये
कॅनडा$ १,१२९$ १,२७९ $ १,४४९$ १,७४९
भारतीय रुपयांमधील किंमत६९,०२४ रुपये ७७,६४४ रुपये ८८,५८८ रुपये १,०६,९२९ रुपये
ऑस्ट्रेलियाA$ १,४९९ A$ १,६४९ A$ १,८४९ A$ २,१९९
भारतीय रुपयांमधील किंमत७९,६१२ रुपये ८७,५७९ रुपये ९८,२०१ रुपये १,१६,७९० रुपये

आयफोन १५ सिरीजबद्दल बोलायचे झाल्यास आयफोन १५ आणि १५ प्लस या बेस मॉडेलच्या किंमती इतर बाजारांसारख्याच आहेत. विशेषतः Apple HDFC बँकेचं कार्ड असणाऱ्या वापरकर्त्यांना ५ हजारांचा डिस्काउंट देत आहे. तथापि, या किंमती अमेरिकेमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक स्वस्त आहेत. बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर यासारख्या गोष्टी किंमतीमधील फरक जवळजवळ कमी करतात.

दुसरीकडे, आयफोन १५ सिरीज पूर्णपणे वेगळी आहे. नवीन आयफोन १५ प्रो आणि याफोन १५ प्रो मॅक्सच्या किंमती भारतात सर्वात जास्त आहेत. तुम्ही दुबई किंवा व्हिएतनामला जाऊन आयफोन १५ प्रो किंवा १५ प्रो मॅक्स भारतापेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करू शकता. सेल्स टॅक्सनंतर आयफोन १५ सिरीज खरेदी करण्यासाठी सर्वात स्वस्त जागा ही निश्चितपणे अमेरिका आहे. तसेच तुमच्या स्वप्नातला आयफोन घेण्यासाठी कॅनडा आणि जपान ही अधिक चांगली ठिकाणे आहेत.

हेही वाचा : ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह iPhone 15 आणि iPhone 15 प्लस भारतात लॉन्च; किती असणार किंमत?

अमेरिकेत ८.५ टक्क्यांपासून ते १३ टक्क्यांपर्यंत सेल्स टॅक्सचा विचार केल्यानंतरही भारताच्या तुलनेत अमेरिकेत आयफोन १५ प्रो आणि १५ प्रो मॅक्स खरेदी करणे कमीतकमी २५ टक्के स्वस्त असेल. तथापि, अमेरिकेत खरेदी केलेले आयफोन १५ मध्ये सिम कार्ड स्लॉट नसेल. कारण तिथे आयफोन फक्त eSIM ला सपोर्ट करतो. भारतात जिओ, एअरटेल आणि वोडाफोन -आयडिया सारख्या प्रमुख कंपन्या eSIM कार्ड ऑफर करत असल्याने वापरकर्त्यांना जास्त त्रास होणार नाही. दुबई, हॉंगकॉंग आणि व्हिएतनाममध्ये नुकतीच लॉन्च झालेली आयफोन १५ सिरीजच्या किंमती खूपच स्वस्त आहेत. हॉंगकॉंगमध्ये आयफोन १५ प्रो ची किंमत फक्त ९१,००० रुपये आहे. म्हणजेच हे मॉडेल भारताच्या तुलनेत जवळपास ३५,००० रुपयांनी स्वस्त आहे.

Story img Loader