Apple ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. iPhone 15 या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित असा स्मार्टफोन आहे.  अ‍ॅपल या महिन्यात म्हणजेच १२ सप्टेंबरला आपल्या नवीन जनरेशन मधील आयफोनचे लॉन्चिंग करणार आहे. अ‍ॅपल कंपनीने मंगळवारी त्यांच्या वार्षिक आयफोन इव्हेंटचे आमंत्रण पाठवले आहे. ज्यात अनेक प्रॉडक्ट्स सादर १२ सप्टेंबर रोजी कंपनीच्या क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात होणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. पाठवलेल्या आमंत्रणामध्ये या इव्हेंटला “Wonderlust” असे नाव देण्यात आले आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपले नवीन वॉच किंवा नवीन मॅकबुक तसेच एअरपॉड्स देखील लॉन्च करू शकते. मात्र आयफोन १५ सिरीज इव्हेंटचे मुख्य आकर्षण असेल.

भारत देशाबद्दल बोलायचे झाल्यास जवळजवळ ५ वर्षांपासून iPhone पहिल्याच वेळेत लॉन्च होत आहेत. ज्याची सुरुवात कंपनीच्या दहाव्या वर्धापनदिनाच्या iPhone X पासून झालेली आहे. iPhone X त्याच तारखेला भारतात लॉन्च झाला होता ज्या दिवशी तो जागतिक स्तरावर लॉन्च झाला होता. तेव्हापासून, मोठ्या प्रमाणावर सर्व आयफोन्स अमेरिकेप्रमाणेच भारतात पण विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. असे वाटते यंदाच्या वर्षी देखील यामध्ये काही बदल नसेल. जागतिक स्तरावर आयफोन १५ सिरीज लॉन्च होईल तेव्हाच भारतात देखील त्याचे लॉन्चिंग केले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच अमेरिका आणि इतर ठिकाणी आयफोन १५ लॉन्च होईल त्याच वेळी भारतातील Apple चे चाहते देखील ही सिरीज खरेदी करता यावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal : ‘शीशमहल’चा मुद्दा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जाणार? नवी दिल्लीची जागा जिंकण्यासाठीचा मुख्य अडसर?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
Image Of Adani Power
Adani Power चे शेअर्स दोन दिवसांत २७ टक्क्यांनी कशामुळे वाढले? कंपनीने सांगितले कारण
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Image of an iPhone with a USB-C port or a related graphic
iPhone युजर्सची चिंता वाढवणारी बातमी! यूएसबी-सी पोर्टद्वारे हॅक होऊ शकतात फोन, सुरक्षा संशोधकाचा दावा

हेही वाचा : Apple Event 2023: ‘या’ दिवशी लॉन्च होणार iPhone 15 सिरीज; कधी आणि कुठे पाहता येणार इव्हेंट?

तथापि , यावेळी एक मोठा बदल असू शकतो तो म्हणजे ‘मेड इन इंडिया’ आयफोनची वेळ. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार Apple ने आपले नवीन मॉडेल लॉन्च करून देशामध्ये एक नवीन ध्येय गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. Apple कंपनी प्रामुख्याने सप्टेंबरच्या मध्यात चेन्नई येथील फॉक्सकॉनच्या युनिटमध्ये तयार करण्यात आलेले आयफोन १५ सिरीजमधील फोन्स लॉन्च करण्याच्या दृष्टीने काम करत आहे.

२०२२ मध्ये चेन्नईतील फॉक्सकॉनच्या फॅक्टरीचे जागतिक स्तरावर लॉन्चिंग झाले. त्यानंतर १० दिवसांच्या आतच आयफोन १४ चे उत्पादन तिथे सुरु करण्यात आले होते. तर मेड इन इंडिया आयफोन बाजारात येण्यासाठी जवळजवळ १ महिन्याचा कालावधी लागला. यावर्षी आयफोन १५ च्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची सर्व प्रकारची तयारी चांगल्या प्रकारे सुरू आहे. आयफोन १५ चे ट्रायल प्रॉडक्शन जून महिन्यातच चीनमाधील फॉक्सकॉनच्या झेंगझोऊ (Zhengzhou ) फॅक्टरीमध्ये सुरु झाले होते.

हेही वाचा : लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली iPhone 15 ची किंमत, iPhone १४ पेक्षा आहे ‘इतका’ महाग

डिसेंबर २०२३ मध्ये निर्यात होण्याची शक्यता

Apple सुरुवातीला स्थानिक बाजारपेठ आकर्षित करण्यासाठी भारतात तयार करण्यात आलेली आयफोन १५ सिरीज मधील डिव्हाइस लॉन्च करण्याची योजना आखत आहे. कारण सणासुदीच्या काळात भारतात मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनी डिसेंबरनंतर युरोप आणि अमेरिकेसह सर्वत्र आयफोन १५ ची निर्यात सुरु करू शकते.

Story img Loader