Apple iPhone 15 Series Booking Date in India : Apple कंपनीने १२ सप्टेंबर रोजी बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. त्यामध्ये आयफोन १५ , आयफोन प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीचा हा इव्हेंट कॅलिफोर्नियामध्ये पार पडला. कंपनीने आयफोन १५ सिरीजमधील मॉडेल्समध्ये अनेक अपडेट्स दिले आहेत. ज्यात ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि टाइप सी पोर्ट अशा काही फीचर्सचा समावेश आहे. आयफोन १५ , आयफोन १५ प्लसची किंमत आयफोन १४ सिरीजमधील मॉडेल्समध्ये असलेल्या डिव्हाइसप्रमाणेच आहे. मात्र आयफोन १५ प्रो मॉडेलच्या किंमतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
नुकत्याच लॉन्च झालेल्या आयफोन १५ सिरीजमधील सर्व मॉडेल्सचे बुकिंग १५ सप्टेंबरपासून म्हणजेच आज संध्याकाळी ५.३० वाजता सुरु होईल. इच्छुक खरेदीदार त्यांच्या आवडीचे मॉडेल हे अधिकृत apple च्या वेबसाइट किंवा अधिकृत स्टोअरमधून मिनिमम टोकन रक्कम भरून बुकिंग करू शकणार आहेत. आयफोन १५ सिरीजची डिलिव्हरी भारतात २२ सप्टेम्बरपासून सुरु होणार आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
हेही वाचा : Vodafone-Idea चे ‘हे’ आहेत ३० दिवसांची वैधता असणारे प्लॅन्स; ओटीटीसह युजर्सना मिळणार…
भारतात आयफोन १५ सिरीजमधील मॉडेल्सची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरु होते. आयफोन १५ प्रो मॅक्स या मॉडेलची किंमत १,५९,९०० रुपयांपासून सुरु होते. सर्व नवीन आयफोन मॉडेल्स आता यूएसबी – सी पोर्ट आणि ४८ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह येतात. या सिरीजमध्ये सर्वात मोठे पग्रेड हे आयफोन १५ प्रो मॅक्स मध्ये पाहायला मिळते. ज्यामध्ये आता टायटॅनियम चेसिस, पेरिस्कोप लेन्स, यूएसबी-सी आणि action बटण १७ प्रो चिप आणि असे अनेक फीचर्स मिळतात. Apple कंपनीने आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्समध्ये नवीन टायटॅनियम फ्रेम दिली आहे. टायटॅनियम फ्रेम हे इव्हेंटमध्ये देखील हायलाइट करण्यात आले होते. प्रो मॉडेल्स हे कंपनीने तयार केलेले सर्वात हलके आहे. तसेच या मॉडेल्समध्ये नवीन हार्डवेअर अपडेट देखील मिळाले आहे. ते म्हणजे नवीन A17 Pro चिपसेटचा सपोर्ट यात देण्यात आला आहे.
Apple वॉच सिरीज ९, वॉच अल्ट्रा २ आणि एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन) यूएसबी – सी सह आधीपासूनच ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. आयफोन १५ मधील नवीन मॉडेल्ससह हे सर्व प्रॉडक्ट्स शुक्रवार म्हणजेच २२ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहेत.