अॅपल कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन ५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. काल म्हणजेच १५ सप्टेंबरपासून आयफोन १५ सीरिजचे प्री-बुकिंग सुरु झाले आहे. भारतात देखील खरेदीदार याचे प्री-बुकिंग करू शकतात. त्यांना हे फोन लॉन्चिंग ऑफर्समुळे कमी किंमतीत मिळू शकतात. अधिकृत विक्री ही २२ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. तर नवीन आयफोन्सच्या भारतातील किंमती आणि त्यावर कशाप्रकारे डिस्काउंट ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.
iPhone 15: भारतातील किंमत
आयफोन १५ सिरीजमधील बेस मॉडेल असलेला आयफोन १५ तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ७९,९०० रुपये आहे. तसेच २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८९,९०० रुपये तर ५१२ जीबी मॉडेलची किंमत १,०९,९०० रुपये आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
हेही वाचा : आता चॅटिंग होणार आणखी सुरक्षित; वापरकर्त्यांसाठी WhatsApp आणणार ‘हे’ फिचर, जाणून घ्या
iPhone 15 Plus : भारतातील किंमत
आयफोन १५ प्लस देखील तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ८९,९०० रुपये आहे. तसेच २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९९,९०० रुपये तर ५१२ जीबी मॉडेलची किंमत १,१९,९०० रुपये आहे.
iPhone 15 Pro : भारतातील किंमत
Apple कंपनीने आयफोन १५ सिरीजमध्ये दोन प्रो मॉडेल्स लॉन्च केले आहेत. यामध्ये आयफोन १५ प्रो हा तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. यातील १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १,३४,९०० रुपये आहे. तसेच २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,४४,९०० रुपये तर ५१२ जीबी मॉडेलची किंमत १,८४,९०० रुपये आहे.
iPhone 15 Pro Max: भारतातील किंमत
आयफोन १५ प्रो मॅक्स हे १५ सिरीजमधील सर्वात शेवटचे मंडले आहे. हे देखील कंपनीने तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहेत. २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या मॉडेलची किंमत १,५९,९०० रुपये , २५ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत १,७९,९०० आणि १ टीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत १,९९,९०० रुपये आहे.
हेही वाचा : आता जगभरात भारताचा डंका; iPhone 15 सिरीजच्या ‘या’ मॉडेल्समध्ये ISRO चे GPS; जाणून घ्या…
भारतातील आयफोन १५ सिरीजवरील ऑफर्स
आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस HDFC बँकेच्या खरेदी कार्डाच्या व्यवहारांवर खरेदीदारांना फ्लिपकार्टवर ५ हजारांच्या डिस्काउंट ऑफरसह उपलब्ध आहे. ज्यांच्याजवळ HDFC चे डेबिट कार्ड आहे त्यांनी EMI पर्याय निवडल्यानंतर या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. फ्लिपकार्ट आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स वर अशा ऑफर्स देत नाही आहे.
खरेदीदार Apple च्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवरून देखील आयफोन खरेदी करू शकतात. कंपनीने आयफोन १५ प्रो , आयफोन १५ प्रो मॅक्स मॉडेलवर डिस्काउंट आणि कॅशबॅकची घोषणा केली आहे. HDFC बँकेचे कार्ड वापरणारे ६ हजारांच्या डिस्काऊंटचा आनंद घेऊ शकतात. नॉन प्रो मॉडेलवर ५ हजारांचा कॅशबॅक ऑफर आहे. कंपनी जुन्या आयफोन मॉडेल्सवर बँक डिस्काउंट ऑफर देखील देत आहे. ज्यामध्ये आयफोन १४ आणि १४ प्लसवर ४ हजार रुपये, आयफोन १३ वर ३ हजार रुपये आणि आयफोन SE वे २ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे.