iPhone 15 या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित असा स्मार्टफोन आहे. लवकरच iPhone 15 लॉन्च होणार आहे. आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन 15, आयफोन 15 Pro, आयफोन 15 Plus आणि आयफोन 15 Pro Max चा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच या लाइनअपमध्ये iPhone 15 Ultra ची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मागील तीन लाइनअपप्रमाणेच अ‍ॅपल या वर्षी नवीन आयफोन १५ सिरीजमधील चार आयफोनचे लॉन्चिंग करेल. तथापि अनेक रिपोर्ट असे सूचित करतात की, आयफोन १५ प्रो मॅक्स ऐवजी आयफोन १५ अल्ट्रा लॉन्च केला जाऊ शकतो. लीक झालेल्या एका आणखी रिपोर्टनुसार आयफोन १५ अल्ट्रा हा लाइनअप मधील पाचवा स्मार्टफोन असू शकतो. अधिकृत घोषणेपूर्वी, संपूर्ण आयफोन 15 अल्ट्राचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.

अ‍ॅपल ट्रॅकर हँडलAppleLeaker on X नुसार, आयफोन १५ अधिक सुधारित कॅमेऱ्यासह येऊ शकतो. विशेष करून झूम डिपार्टमेंटमध्ये. फोनचा कॅमेरा 10X पेरिस्कोप झूम पर्यंत सपोर्ट करू शकतो. प्रायमरी कॅमेरा हा ४८ मेगापिक्सलचा असून त्यात ८ लेन्सचा समावेश असू शकतो. याशिवाय, अधिक प्रीमियम आणि टिकाऊ बिल्डसाठी फ्रेममध्ये टायटॅनियमची सुविधा असू शकते. अनेक लीक रिपोर्टमध्ये आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेलबाबत देखील असेच सुचवण्यात आले होते. फोनच्या बाजूला कंपनी व्हॉल्युम बटणाचे डिझाईन बदलू शकते. आयफोन १५ अल्ट्रा मध्ये कॅमेरा अ‍ॅपसह क्विक लॉन्च अ‍ॅप्ससाठी बाजूला एक ”अ‍ॅक्शन बटण” देखील दिले जाऊ शकते. मागील वर्षी अ‍ॅपल वाचवर देखील असेच बटण देण्यात आले होते. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
Lashkar e Taiba  Pakistani commander Usman killed in an encounter in an anti terror operation
दहशतवादविरोधी मोहिमेत बिस्किटांचा वापर
gang vandalised 13 vehicle in aundh
ऐन दिवाळीत टोळक्याची दहशत; १३ वाहनांची तोडफोड- ओैंधमधील महापालिका वसाहतीतील घटना
Apple CEO Tim Cook give diwali wishes with an photo of diyas clicked by an Indian photographer
भारतीय फोटोग्राफरने काढलेला सुंदर फोटो शेअर करत Appleचे सीईओ टीम कुक यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पाहा, पोस्ट होतेय व्हायरल
Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
Mobile Phone Slips Into Boiling Oil
Mobile Blast News: जेवण बनवताना तरी मोबाइल दूर ठेवा! गरम तेलाच्या कढईत मोबाइल पडून झाला स्फोट, युवकाचा दुर्दैवी मृत्यू

हेही वाचा : लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली iPhone 15 ची किंमत, iPhone १४ पेक्षा आहे ‘इतका’ महाग

हुड अंतर्गत, iPhone 15 Ultra मधेय नवीन A17 Bionic SoC मधून 3nm प्रोसेसचा सपोर्ट मिळू शकतो. तसेच यात ८ जीबी रॅम मिळू शकते. रिपोर्टनुसार याचे बेस मॉडेल हे डायरेक्ट २५६ जीबी स्टोरेज ऑफर करेल. सर्व नवीन आयफोन १५ मॉडेल्स लाइटनिंग पोर्टऐवजी चार्जिंगसाठी USB-C पोर्टसह येऊ शकतात. जर का आयफोन १५ अल्ट्रा लॉन्च झाला तर तर यात देखील समान चार्जिंग सपोर्ट येईल. तसेच आयफोन १५ अल्ट्रा मध्ये ३५ W चार्जिंग सपोर्ट येईल. चार्जर बॉक्समध्ये समाविष्ट नसेल.

तसेच या फोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले असू शकतो. यामध्ये अधिक स्लिम बेझल्स दिसू शकतात. कंपनी काही बदलांसह डायनॅमिक आयलंड नॉच समाविष्ट करणे सुरू ठेवू शकते. नवीन फीचर्स आणि हार्डवेअर जोडल्यामुळे आयफोन १५ अल्टरची किंमत वाढण्याची शक्यता आहे. एक लीक नुसार माहिती समोर आली आहे की, याची किंमत २००$ (सुमारे १६,५०० रुपयांनी) ने वाढू शकते. आयफोन १४ प्रो मॅक्स ची किंमत भारतात १,३३,९०० रुपयांपासून सुरु होते.