iPhone 15 Vs iPhone 16 :ॲपलने त्यांच्या आगामी सीरिज आयफोन १६ ची लाँच तारीख जाहीर केली आहे. येत्या ९ सप्टेंबरला कंपनी ‘इट्स ग्लोटाइम’ नावाच्या कार्यक्रमात नवीन आयफोन १६ आणि इतर उत्पादनांचे अनावरण करील, असे सांगण्यात आले आहे. तर आता नवीन लाँच होणाऱ्या आयफोन १६ मध्ये काय खास असणार? सध्याच्या आयफोन १५ सीरिजपेक्षा त्यात काय वेगळे असणार? जर तुम्ही सध्या आयफोन १५ वापरत असाल, तर तुम्ही आयफोन १६ खरेदी करावा का? असे प्रश्न तुमच्याही मनात आले असेल ना? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून जाणून घेऊ. त्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्यात मदत होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयफोन १५ आणि आयफोन १६ यात फरक काय?

आयफोन १६ मध्ये उभ्या कॅमेरा सेटअपसह एक नवीन डिझाईन असेल; ज्यात ॲक्शन बटण व कॅप्चर बटणचा समावेश असेल. त्यामुळे ते आयफोन १५ पेक्षा खूप वेगळा व खास असणार आहे. आयफोनच्या पुढच्या बाजूला डायनॅमिक आयलंडसह ६.१ इंच ६० एचझेड ओएलईडी स्क्रीन असणार; जी iPhone १५ प्रमाणेच असणार आहे. फक्त आयफोन १६ प्रो मॉडेल्समध्ये रिफ्रेश- रेट, डिस्प्ले थोडा वेगळा असेल.

ए१८ (A18) चिप :

आयफोन १५ आणि आयफोन १६ मधील सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे चिपसेट. कारण- आयफोन १५ व १४ मध्ये A16 चिप वापरली गेली होती. तर, आयफोन १६ मध्ये A18 चिपसेट असणार आहे; त्यामुळे तो जवळजवळ दोन जनरेशन पुढे जाईल. ही नवीन चिप ऑन-डिव्हाइस AI प्रक्रिया इनेबल करेल, ॲपल इंटेलिजेन्सची ओळख करून देईल आणि गेमिंग, मल्टीटास्किंगसह अनेक सुधारणा आयफोनमध्ये करील. तर, ॲपल इंटेलिजेन्स इनेबल करण्यासाठी ॲपल रॅम ६ जीबीवरून ८ जीबीपर्यंत वाढविण्यात आला आहे; जो आयफोन १६ ला बूस्ट करण्यासाठी सोईस्कर ठरेल. केवळ परफॉर्मन्स नाही, तर नवीन A18 चिप, जी TSMC च्या कटिंगचा edge 3nm प्रक्रियेचा वापर करून फॅब केली आहे; ती आयफोन १५ 4nm A16 Bionic पेक्षा खूप जास्त पॉवर देणारी असणार आहे.

हेही वाचा…iPhone 16 Launch: अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला लाँच होणार iPhone 16; एआयसह ‘या’ फीचर्सचा असणार समावेश ; पण किंमत…

कॅमेरा हार्डवेअर

आयफोन १६ मध्ये आयफोन १५ प्रमाणेच ४८ एमपी प्रायमरी, १२ एमपी अल्ट्रा-वाइड आणि १२ एमपी सेल्फी कॅमेरा असेल. फक्त A18 वर असणाऱ्या इमेज सेन्सिंग प्रोसेसिंग (ISP) मुळे iPhone 16 ची फोटो व व्हिडीओ गुणवत्ता आयफोन १५ पेक्षा चांगली असणार आहे. खास गोष्ट अशी की, iPhone 16 वरील व्हर्टिकल aligned कॅमेऱ्याच्या मदतीने युजर्सना 3D व्हिडीओ रेकॉर्डिंग, फोटो कॅप्चर करण्याची संधी मिळेल; जी सध्या आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्सवर उपलब्ध आहे.

दोन्ही आयफोन आयओएस १८ला करतील सपोर्ट

आयफोन १६ आणि आयफोन १५ दोन्ही iOS 18 वर स्मूथ चालतील. पण, आयफोन १६ वर युजर्सना ॲपल इंटेलिजेन्स, चॅटजीपीटीचा अधिक उत्तम अनुभव घेता येईल. पण, iPhone १६ लाँच होईल तेव्हा हे ॲपल इंटेलिजेन्स (एआय) फीचर उपलब्ध होणार नाहीत. त्याऐवजी ही फीचर नंतर ऑक्टोबरमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

किमतीतील फरक

ॲपलने आयफोन १६ लाँच केल्यानंतर आयफोन १५ ची किंमत किमान २० हजार रुपयांनी कमी होऊ शकते. म्हणजेच आयफोन १५ तुम्हाला ६० हजारांपर्यंत मिळू शकतो. तसेच आयफोन १६ ची किंमत ७९ हजार रुपयांपासून सुरू होणार आहे. पण, आयफोन १५ पेक्षा आयफोन १६ महाग असला तरीही जे तंत्रज्ञानप्रेमी आहेत त्यांनी नक्कीच आयफोन १६ ची प्रतीक्षा करावी. कारण- नवीन आयफोन आणखीन चांगले फीचर्स तुम्हाला देईल. तसेच ज्यांना नियमित आयफोन वापरायचा आहे, त्यांच्यासाठी आयफोन १५ बेस्ट ठरेल. तर असा आयफोन १५ आणि आयफोन १६ यांच्यात फरक असणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphone 15 vs 16 apple is expected to reduce the iphone 15 price by at least 20 thousand after the launch of iphone 16 here are the details asp