Is it worth to go Dubai to buy an iPhone 16 Pro Max : ९ सप्टेंबर २०२४ रोजी ॲपलचा ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटमध्ये आयफोन १६ (iPhone 16) लाँच करण्यात आला. ॲपल कंपनीचा फोन म्हटल्यावर त्याचे फीचर्स, त्याची किंमत भारी असणारच… त्यामुळे आपल्यातील अनेकांनी आयफोन कुठे ऑफरसह मिळतोय का, कुठे आयफोनवर डिस्काउंट आहे का यासाठी नक्कीच सर्च करून पाहिलं असेल. तर याचसंबंधित एक माहिती समोर येत आहे. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, विमान प्रवास व इतर खर्च विचारात घेऊन, आयफोन भारतात खरेदी करण्यापेक्षा दुबईला जाऊन खरेदी करणे जास्त स्वस्त असू शकतं का? आधी असेल, पण आता नाही… पण असं का? तर नक्की यामागचं आर्थिक गणित काय असेल जाणून घेऊ या…
दुबईला जाऊन आयफोन स्वस्तात खरेदी करणे आता शक्य होणार नाही. कारण आयफोन १६ प्रो मॅक्स (iPhone 16 Pro Max) भारतात लाँच झाला आहे. या २५६ जीबी मॉडेलची किंमत १,४४,९०० रुपये आहे आणि निवडक क्रेडिट कार्डांवर ५००० ची सूट देऊन त्याची किंमत १,३९,००० अशी होऊ शकते.
तर दुबईला जाऊन आयफोन खरेदी करण्यात आणि भारतात आयफोन खरेदी करण्यात नेमका काय फरक आहे?
१. दुबईमधील आयफोन १६ ची किंमत : (संयुक्त अरब अमिरातीमध्ये (AED) ५,०९९) अंदाजे १ लाख १६ हजार ५५० रुपये इतकी आहे)
२. दुबईला जाण्यासाठी लागणाऱ्या व्हिसाची किंमत : ७ हजार रुपये (१४ दिवस पर्यटक)
३. दुबईला जाण्यासाठी फ्लाइटची किंमत : दिल्ली ते दुबई प्रवासासाठी सुमारे २० हजार रुपये खर्च येतो.
एकूण : तर विमान खर्च व इतर खर्च पकडून आयफोन १६ ची किंमत १ लाख ४३ हजार ५५० रुपये होत आहे, जी आधीपासून भारतीय किमतीपेक्षा खूप जास्त आहे. यामध्ये खाण्याचा, दुबईत राहण्याचा खर्च, इतर वेगळे खरेदी खर्चदेखील नमूद करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुबईला जाऊन आयफोन खरेदी करणे तुमच्या बजेटच्या बाहेर जाऊ शकतं एवढं नक्की.
भारतात आयफोन खरेदीची किंमत का कमी झाली?
इलेक्ट्रॉनिक्सवरील आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा झाल्यानंतर ॲपलनेही भारतातील आयफोनच्या किमती ५,१०० ते ६,००० रुपयांनी कमी केल्या आहेत.
नवीन iPhone 16 चे फीचर्स काय आहेत?
नवीन ॲपल आयफोन १६ प्रो मॅक्सला ए १८ प्रो ( A18 Pro ) चिप, जी आजपर्यंतची आयफोनमधील सर्वात वेगवान आणि सर्वात कार्यक्षम प्रोसेसर, एआरएम व्ही ९ (ARM V9) आर्किटेक्चरवर आधारित आहे; जो ॲपल इंटीलिजन्स, ॲपलच्या एआय फीचर्सला सुरळीत सुरू ठेवेल. यात अनेक फीचर्स आहेत, ज्यात एक फिजिकल कॅमेरा कंट्रोल बटण, ४ के १२० डॉल्बी व्हिजन आणि मोठा ६.९ इंचाचा डिस्प्ले, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा iPhone स्क्रीन ठरतो आहे.