iPhone 16 Design & Colour Options : सध्या अनेक दिवसांपासून आयफोन १६ ची बरीच चर्चा सुरू आहे. पण, iPhone 16 सिरीज कधी लाँच होईल याबाबत अ‍ॅपलने जास्त माहिती दिलेली नाही. पण, कंपनीकडून लीक होणारी माहिती पाहून ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे, असे म्हणायला हरकत नाही. प्रीमियम टेक ब्रँड गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आपले नवीन आयफोन सादर करू शकेल, असंही सांगितलं जात आहे. तर तुम्हीदेखील आयफोन १६ खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आयफोन १६ मध्ये कोणते रंग पर्याय असणार आहेत? कॅमेरा, डिस्प्ले, चिपसेट तसेच कोणते नवीन फीचर्स असणार आहेत, याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Reddit युजरने @kaxeno5 वर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये iPhone 16 काळा व पांढरा या दोन रांगांमध्ये दिसतो आहे. पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या आयफोनच्या फोटोमध्ये मागे असणारा कॅमेरा सेटअप हायलाइट करण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्हाला ड्युअल-कॅमेरा युनिट दिसेल. या नवीन डिझाईनमध्ये एका गोळीच्या आकाराचा कॅमेरा मॉड्यूलदेखील समाविष्ट आहे, जो आयफोन एक्स (iPhone X) ची आठवण करून देणारा आहे; जो तुम्हाला व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यास मदत करेल.

हेही वाचा…Aadhaar Card : आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं? चिंता सोडा! फक्त ‘या’ सहा स्टेप्स फॉलो करा

आयफोन १६ डिस्प्ले :

iPhone 16 मध्ये फ्लॅशची जागा बदलण्यात आली आहे. तसेच आयफोन फक्त पांढऱ्या व काळ्या रंगाव्यतिरिक्त निळा, हिरवा, गुलाबी आदी रंगांमध्येदेखील असणार आहे. तसेच आयफोन १६ मध्ये ६.१ इंचाचा OLED डिस्प्ले, ॲक्शन बटण, एक यूएसबी सी पोर्ट असणार आहे; हे फीचर सध्या फक्त iPhone 15 Pro मॉडेल्सवर दिसून येते, जे आता आयफोन १६ मध्येसुद्धा दिसून येईल. तसेच आयफोन १६ आणि आयफोन १६ प्लस TSMC च्या 3nm वर तयार केलेल्या A18 बायोनिक चिप किंवा प्रोसेसरसुद्धा देईल.

आगामी सर्व आयफोन १६ सीरिजच्या मॉडेलमध्ये A18 चिपसेट दिला जाऊ शकतो, याची शक्यता जास्त आहे. कारण यामुळे आयफोन्स ऑफलाइन एआय टास्क करू शकतील. पण, प्रो व्हेरिएंटपेक्षा आयफोन १६ आणि आयफोन १६ प्लसमधील प्रोसेसर वेगळा असू शकतो. आगामी आयफोन १६ सीरिजमध्ये रॅम बूस्ट फीचरचा समावेश केला जाऊ शकतो; तसेच जुन्या मॉडेलमधील 6GB रॅमऐवजी यंदा 8GB RAM दिला जाऊ शकतो

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphone 16 five colour option features camera display chipset here is a bunch of updates that you might expect to see asp