Apple iPhone 16 Launch Date : आपल्याकडे आयफोन असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. आयफोनचा कॅमेरा व त्याच्या अनोख्या फीचर्समुळे तरुण मंडळींमध्ये त्याची बरीच क्रेझ आहे. तर आता अनेक दिवसांपासून आयफोन १६ (iPhone 16) लाँच होणार आहे अशी बरीच चर्चा सुरु आहे. पण, इतके दिवस हा फोन कधी लाँच होणार, त्याची किंमत काय असणार? याची कोणतीच माहिती समोर आली नव्हती. पण, आता ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहचणार आहे. कारण आयफोन १६ ची लाँच तारीख जाहीर करण्यात आली आहे.

ॲपलने काल सोमवारी ‘इट्स ग्लोटाइम’ नावाच्या ९ सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठी आमंत्रणे पाठवले आहे ; जिथे कंपनी नवीन आयफोन १६ आणि इतर उत्पादनांचे अनावरण करेल असे सांगण्यात येत आहे. तर हा कार्यक्रम स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात पार पडणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे, ॲपलने आमंत्रणात iPhone 16 चा उल्लेख केला नाही किंवा ते कोणती उत्पादनांचे करतील याची कोणतीच माहिती दिली गेली नाही. पण, आयफोन १६ लाइनअपचे लॉन्च होणार हे निश्चित आहे. हा इव्हेंट पॅसिफिक वेळेनुसार सकाळी १० किंवा १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल.

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Vaikuntha Ekadashi Vrat
Vaikuntha Ekadashi 2025: गूगलवर ट्रेंड होतेय २०२५ मधील पहिली एकादशी; जाणून घ्या एकादशीचा शुभ मुहूर्त आणि तिथी
Makar Sankranti 2025 Puja Time and Significance in Marathi
Makar Sankranti 2025: १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार मकर संक्रांत; जाणून घ्या संक्रांतीचा पुण्य काळ, तिथी आणि महत्त्व
CET , Revised schedule, entrance exams, CET Cell,
सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर, काय आहेत बदल?
EC on Delhi Election 2025 Dates| Delhi Election 2025 Dates Schedule
Delhi Election 2025 Dates : ठरलं! दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारीला आणि निकाल ८ फेब्रुवारीला; निवडणूक आयुक्तांची घोषणा

Apple साठी, iPhone 16 लाँच इव्हेंट हा खास असणार आहे. कारण – डिस्प्ले किंवा अपग्रेड कॅमेऱ्यांमुळे नाही तर “ॲपल इंटेलिजन्स” फीचरमुळे आयफोन १६ सेगमेंटचे आकर्षण वाढवणार आहे. ॲपलने इंटेलिजन्स आयफोन १६ लाइनअपमध्ये चार मॉडेल सादर करेल ; ज्यामध्ये एंट्री-लेव्हल मॉडेल (आयफोन १६ व आयफोन १६ प्लस) आणि दोन हाय -एंड मॉडेल (आयफोन १६ प्रो व प्रो मॅक्स ) यांचा समावेश असेल. iOS 18 मधील फीचर्सचा भाग म्हणून सर्व चार मॉडेल्स Apple Intelligence ला सपोर्ट करतील.

हेही वाचा…सेकंड हॅण्ड iPhone घेण्याचा विचार करताय? मग ‘या’ गोष्टी एकदा नक्की बघा; नाही तर होईल नुकसान

ॲपल इंटेलिजन्स :

ॲपल इंटेलिजन्स फीचर्समध्ये, जसे की नवीन रायटिंग टूल्स , मेसेज ॲपमध्ये रिप्लाय काय द्यायचा हे सुचवणे , ईमेल सारांश, फोन कॉल ट्रान्सक्रिप्शन, ॲनिमेटेड फोटो तयार करणे, ChatGPT मेकर OpenAI बरोबरच्या पार्टनरशिपद्वारे रोल आउट केले जात आहे. तसेच आयफोन १६ मध्ये Genmoji नावाचा इमोजी, या वर्षाच्या शेवटी किंवा २०२५ च्या सुरुवातीला येण्याची अपेक्षा आहे. पण, iPhone 16 लाँच होईल तेव्हा हे ॲपल इंटेलिजन्स (एआय) फीचर उपलब्ध होणार नाहीत. त्याऐवजी, ही फीचर नंतर ऑक्टोबरमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच नवीन लाँच केलेल्या AI फीचर्समुळे आयफोनच्या विक्रीत वाढ होऊ शकते असे सांगण्यात आलं आहे. ॲपल AI फीचर्स वापरण्यासाठी सब्स्क्रिप्शन शुल्क आकारेल की, प्रीमियम सेवा म्हणून ऑफर करेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.

आयफोन १६ प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्स ६.१ इंच आणि ६.७-इंच डिस्प्लेच्या तुलनेत ६.३-इंच आणि ६.९-इंच स्क्रीनसह उच्च-एंड प्रो मॉडेलचा डिस्प्ले मोठा असेल. आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्सचे कॅमेऱ्यात डीएसएलआर कॅमेऱ्यासारखे व्हिडीओ शूटिंग व फोटो घेण्यासाठी डिझाइन केलेले नवीन बटण असणार आहे. Apple इंटेलिजेंस फीचर्सला सपोर्ट करण्यासाठी, चारही iPhones वर बॅटरी लाईफ नवीन A18 प्रोसेसर आणि 8 गीगाबाइट मेमरीसह असणार आहे.

तसेच या कार्यक्रमात आयफोन १६ सिरीज बरोबर ॲपल नवीन वॉच मॉडेल्स सादर करेल ; ज्यात ॲपल वॉच अल्ट्रा ३ , मुलांसाठी स्वस्तात-मस्त प्लास्टिक ॲपल वॉच एसई आणि ॲपल वॉच सिरीज १०, ॲपल एअरपॉड्सचे अनावरण देखील करू शकते..

Story img Loader