iPhone 16 Pro Vijay Sales offer : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नवीन आयफोन १६ प्रो लाँच करण्यात आला होता. आयफोन म्हटले की, थोडेसे बजेटबाहेर जाऊन फोन खरेदी करणे ही गोष्ट आलीच. पण, तुम्हाला अगदी कमी पैशात, तुमच्या बजेटबाहेर न जाता आयफोन १६ प्रो खरेदी करायचा असेल, तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा… या फोनवर विजय सेल्स १५,००० रुपयांपर्यंतची खास ऑफर घेऊन आला आहे, ज्यामुळे हा फोन खरेदी करणे तुम्हाला अगदी सोपे जाईल.

किंमत कमी आणि अतिरिक्त बँक ऑफर्स उपलब्ध असल्याने, ग्राहक आयफोन खरेदीवर मोठी बचत करू शकतात. १२८ जीबीचा आयफोन १६ प्रो एक लाख १९ हजार ९०० रुपयांना लाँच करण्यात आला होता. पण, विजय सेल्समध्ये या आयफोनची किंमत १,०९,५०० रुपये आहे, ज्यामुळे १०,४०० रुपयांची थेट सूट मिळत आहे.

एचडीएफसी बँक ऑफर : एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त चार हजार ५०० रुपयांची सूट मिळू शकते. त्यामुळे हा आयफोन मूळ किमतीपेक्षा १,०५,००० रुपयांपर्यंत कमी किमतीत मिळण्याची संधी आहे.

इतर बँक ऑफर्स : जर तुमच्याकडे आयसीआयसीआय, ॲक्सिस किंवा कोटक बँकेचे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हाला ३,००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते, ज्यामुळे आयफोनची किंमत १,०६,५०० रुपये होते. या ऑफर्ससह नवीन आयफोन सगळ्यात बेस्ट किमतीसह तुम्ही खरेदी करू शकता.

आयफोनचे फीचर्स

आयफोन १६ प्रो मध्ये ६.३ इंचांचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, जो १२०Hz प्रमोशन तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. आयफोन A18 प्रो चिपद्वारे समर्थित आहे, ज्यामुळे त्याची परफॉर्मन्स, इफिशियन्सी व बॅटरी लाइफ वाढते. तसेच कॅमेराच्या ट्रिपल-कॅमेरा सेटअपमुळे मोबाईल फोटोग्राफी चाहत्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

आयफोन १६ प्रो मध्ये ४८ मेगापिक्सेल फ्युजन कॅमेरा २x झूमसह आणि ४८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्ससह देण्यात आला आहे.

दूरच्या गोष्टी कॅप्चर करण्यासाठी ५x ऑप्टिकल झूमसह १२ मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे.

फ्रंट कॅमेरा १२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेल्फी आणि उच्च-गुणवत्तेचे फेसटाइम कॉल सुनिश्चित करतो. अ‍ॅपलने कॅमेरा कंट्रोल बटणदेखील सादर केले आहे, ज्यामुळे जलद फोटो आणि व्हिडीओ घेणे सोपे होते.