Mumbai iPhone 16 Sale Start Today : ॲपल (Apple) ने या महिन्याच्या सुरुवातीला नवीन आयफोन १६ सिरीज लाँच केली. नवीन सीरिजमध्ये आयफोन १६ (iPhone 16) , आयफोन १६ प्लस (iPhone 16 Plus), आयफोन १६ प्रो (iPhone 16 Pro) आणि आयफोन १६ प्रो मॅक्स (iPhone 16 Pro Max) या चार फोन्सचा समावेश आहे. हे चारही आयफोन्सची गेल्या आठवड्यात भारतात प्री-ऑर्डर देखील सुरु झाली आहे आणि आता डिव्हाइसेस देशात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आयफोन १६ आणि आयफोन १६ प्लस हे ए१८ बायोनिक ( Bionic) चिपसेट तर आयफोन १६ प्रो, आयफोन १६ प्रो मॅक्मध्ये ए१८ प्रो (A18 Pro) चिपसेट देण्यात आला आहे. सर्व चार iPhones iOS 18 ऑपरेटिंग सिस्टम आणि नवीन कॅमेरा कॅप्चर बटणासह येतात.

आयफोन १६ कुठून खरेदी करता येईल?

ग्राहक आता ॲपल स्टोअर, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा, रिलायन्स डिजिटलवरून आयफोन १६, आयफोन १६ प्लस , आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स ( iPhone 16 Pro Max) ऑनलाइन खरेदी करू शकतात. तसेच दिल्ली, मुंबईतील ॲपल स्टोअर्स व देशातील इतर अधिकृत रिटेल स्टोअर्समधून ऑफलाइन देखील खरेदी करू शकतात.

pakistan google search indian movie 1
भारतीय चित्रपट व वेब सीरिजचं पाकिस्तानला वेड; बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे सीमेपल्याड ठरले सुपरहिट, पाहा यादी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?
Green chillies from Vidarbha, Green chillies,
विदर्भातील हिरवी मिरची थेट दुबईच्या बाजारात
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…

हेही वाचा…iPhone 16 विकत घ्यायला दुबईला जाणं परवडेल का? आधी असेल, पण आता नाही; वाचा काय आहे आर्थिक गणित…

भारतात आयफोनची किंमत किती?

आयफोन १६ ची किंमत भारतात ७९,००० रुपये आहे, तर आयफोन १६ प्रो ची किंमत १ लाख ३४ हजार ९०० रुपये आहे.

आयफोन १६ साठी ऑफर्स :

आयफोन १६ खरेदी करणारे ग्राहक सेल दरम्यान विशेष ऑफरचा लाभ घेऊ शकतात. पात्र अमेरिकन एक्सप्रेस, ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्ड वापरून ५ हजार रुपयांपर्यंतच्या झटपट सूट शिवाय, निवडक, मोठ्या बँकांद्वारे ३ ते ६ महिन्यांसाठी विनाखर्च ईएमआय योजनांसह पर्याय देखील उपलब्ध असणार आहेत.

याबरोबर Apple नवीन आयफोनवर ट्रेड-इन ऑफरही देत ​​आहे. ग्राहक जेव्हा त्यांचे जुने डिव्हाइस एक्सचेंज करतात तेव्हा त्यांना ६७,५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. हे ट्रेड-इन क्रेडिट थेट नवीन आयफोन १६ च्या खरेदीसाठी लागू केले जाऊ शकते, अपग्रेड प्रक्रिया सोपी करून आयफोन १६ खरेदीदारांना ॲपल म्युजिक, ॲपल टीव्ही प्लस आणि ॲपल Arcade चे तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शनही युजर्सना देण्यात येणार आहे.

Story img Loader