Apple launches iPhone 16 series: सोमवारी म्हणजेच ९ सप्टेंबरला ॲपलचा ‘इट्स ग्लोटाइम’ हा बहुचर्चित इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये ॲपलने त्यांच्या आयफोन १६ सीरिजचे डिव्हायसेस लाँच केले. पहिल्यांदाच GenAI फीचर्ससह अ‍ॅपलने ब्रॅण्डेड ॲपल इंटेलिजेन्स, तसेच टेन्थ जनरेशन अ‍ॅपल वॉच आणि नवीन एअरपॉड्स लाँच केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ॲपल सीईओ टिम कुक यांनी आताच्या काळात आपल्याला आवडत असलेल्या अनेक फीचर्सचा लाभ घेऊन, अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence-AI) आणि मशीन लर्निंग कसे आवश्यक आहे हे अधोरेखित करून, त्यांच्या मुख्य भाषणाने इव्हेंटची सुरुवात केली.

आयफोन १६ (iPhone16)

आयफोन १६ हा ६.१ इंच स्क्रीनसह, तर आयफोन १६ प्लसमध्ये नवीन A18 बायोनिक प्रोसेसरसह नवीन कॅमेरा बटण असणार आहे. या कॅमेरा बटणामध्ये नवीन व्हिज्युअल इंटेलिजेन्स फीचर्स आहेत, जी कॅमेऱ्याचा वापर करून तुम्हाला झटपट उत्तरे देण्यास मदत करतील.

आयफोन १६ मध्ये ४८-मेगापिक्सेल फ्युजन कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याद्वारे तुम्ही आता २x टेलिफोटो झूम करू शकता. मॅक्रो फोटोसाठी हे फीचर खूप उपयुक्त ठरणार आहे.

आयफोन १६मध्ये प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट असणार आहे, जे जनरेटिव्ह मॉडेल्सला ॲक्सेस करेल. आयफोन आता युजर्सना टूल्सचा अ‍ॅक्सेस देतो; ज्यामुळे तुमचे लिखाण तुम्ही तपासून बघू शकता. त्या मजकुराचे प्रूफ रिडिंग म्हणजे मजकुरातील चुका शोधून, त्या दुरुस्त करू शकता.

सिरी सेवाही एआयच्या मदतीने अधिक स्मार्ट झाली आहे. तुम्ही फक्त ॲपल इंटेलिजेन्सच्या मदतीने सिरीला एखादी गोष्ट सांगा. ती तुमचे काम अगदी चुटकीसरशी करेल.

ॲपल सिलिकॉनचे व्हीपी श्रीबलन संथनम यांनी सांगितले की, A18 बायोनिक ही जनरेशन Gen AI मॉडेल्सना मदत करण्यासाठी आणि नवीन CPU व GPU आर्किटेक्चरची फीचर्स पूर्वीच्या मॉडेलपेक्षा खूप वेगवान होण्यासाठी आवश्यक आहे.

आयफोन १६ प्रो मॅक्स

आयफोन १६ प्रो मॅक्स ६.९ इंचांची मोठी स्क्रीन घेऊन आला आहे. आतापर्यंतची सर्वोत्तम आयफोन बॅटरी लाइफ या फोनमध्ये असणार आहे. 16-कोर न्यूरल इंजिनसह नवीन ३ नॅनो मीटर A18 प्रो चिपद्वारे समर्थित असलेला हा आयफोन फास्टर रे ट्रेसिंग, प्रो रेस व्हिडीओ रेकॉर्डिंग, जलद USB ट्रान्स्फर आदी युनिक फीचर्ससह सादर झाला आहे. या फोनमध्ये आता 48MP फ्युजन कॅमेरा, 5x टेलीफोटो कॅमेरा, 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. एखादा फोटो काढताना हा कॅमेरा‌ प्रोफेशनल फोटोग्राफिक आणि क्रिएटिव्ह स्टाईल ऑफर करतो. तसेच आयफोन १६ प्रो फोनमध्ये 4K120 फ्रेम्स प्रतिसेकंदासह सिनेमॅटिक स्लो मोशनदेखील आहे. स्टुडिओ-क्वालिटी माइकपासून नवीन साउंड एडिटिंगपर्यंत, iPhone 16 Pro या स्मार्टफोनमध्ये रेअर ऑडिओ कॅपेबिलिटीजसुद्धा देण्यात आल्या आहेत.

ॲपल वॉच सीरिज १० (Apple Watch Series 10)

ॲपल वॉचने १० या वॉचमध्ये तुम्हाला मोठा डिस्प्ले, स्क्रीनवरचा मजकूर वेगाने वाचता यावा यासाठी स्क्रीन एरिया ३० टक्क्यांनी वाढवलासुद्धा आहे. आता ॲपल वॉचवर टाईप करणेही सोपे होणार आहे. ॲपल वॉच १० मध्ये जेट ब्लॅक फिनिश, ॲल्युमिनियम अलॉयमधील बॉडी, आकार, रचना व वजन सारे काही नवीन असणार आहे. तसेच स्पीकरचा आकार ३० टक्क्यांनी कमी; पण तरीही अगदी स्पष्ट ऐकू येईल, असा देण्यात आला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचे आणि युजर्ससाठी उपयोगी असे फास्टेस्ट चार्जिंग ॲपल वॉच ३० सेकंदांत ८० टक्के चार्जिंग करून देणार आहे. तसेच हे वॉच तुम्हाला तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.

ॲपल वॉच सीरिज १० मध्ये ॲपलच्या पहिल्या वाइड अँगल OLED डिस्प्लेसह असलेल्या वेअरेबल सेग्मेंटमध्ये “आतापर्यंतचा सर्वांत मोठा डिस्प्ले आणि सर्वांत पातळ (थिन) डिझाइन” असणार आहे. त्याचबरोबर ॲपल वॉच १० ला टायटॅनियम बॉडी असणार आहे. हे आतापर्यंतचे सर्वांत जलद चार्ज होणारे Apple Watch देखील आहे आणि नवीन S10 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.

ॲपलचे आरोग्य विभागाचे उपाध्यक्ष डॉ. सुंबुल अहमद देसाई म्हणाले की, घड्याळ आता नवीन स्लीप अ‍ॅप्निया डिटेक्शनच्या क्षमतेसह आले आहे; ज्यात अ‍ॅक्सीलरोमीटर असणार आहे; जे श्वासांमधील अनियमितता मॉनिटर करू शकेल.

नवीन एअरपॉड्स

Apple ने नवीन AirPods4 च्या बेस मॉडेल्समध्ये नॉइज कॅन्सलेशन, अडॅप्टिव्ह ऑडिओ व ट्रान्स्परन्सी मोडसह लोकप्रिय एअरपॉड्स रेंजची नवीन जनरेशन लाँच केली. AirPods Max नवीन रंग आणि USB-C चार्जिंगसह अपडेटेड केले गेले आहेत.