Apple announces iPhone 16, iPhone 16 Pro models pricing in India: आयफोनच्या नव्या सीरिजच्या प्रतीक्षेत अनेक नागरिक होते. त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. अ‍ॅपल ग्लोटाइम २०२४ इव्हेंटदरम्यान अखेर iPhone 16 सीरिज लॉंच करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये कंपनीने iPhone 16, iPhone 16 Pro, iPhone 16 plus, iPhone 16 Pro MAX मॉडेलसह चार नवीन iPhone मॉडेल्स लॉंच केले आहेत. भारतात iPhone च्या मॉडेल्सची किंमत किती असेल, हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. चला तर मग जाणून घेऊयात, काय आहेत किमती.

या फोनमध्ये अत्याधुनिक उपकरणे, हार्डवेअर आधारित कॅमेरा कंट्रोल बटण देण्यात आले असून यामुळे वापर करणाऱ्यांच्या फोटोग्राफीचा अनुभव भन्नाट होणार आहे. याशिवाय ए १८ आणि ए १८ प्रोसह जबरदस्त परफॉर्मन्स अपग्रेड्सदेखील देण्यात आले आहेत. ॲपल इंटेलिजेंस आधारित फीचर्समुळे आयफोन वापरण्याचा अनुभव पूर्ण बदलणार आहे.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?
Both exams held statewide school registration and student applications were open from October 17 to December 7
विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,
Nearly 90000 Honda Elevate Suvs Sold Since Launch, See This Details Honda Elevate Suvs price details
वर्षभरात तब्बल ९० हजार ग्राहकांनी खरेदी केली होंडाची ‘ही’ एसयूव्ही कार; जाणून घ्या काय आहे एवढं खास

आयफोन १६ आणि १६ प्लसची वैशिष्ट्ये

ॲपलचा आयफोन १६ हा एरोस्पेस ग्रेड ॲल्युमिनियम डिझाइनसह बाजारात आणण्यात आला आहे. हा फोन पाच नव्या रंगांत उपलब्ध होणार आहे. या फोनला काचेच्या सिरेमिक शील्डसह मजबूत संरक्षण देण्यात आले आहे. आयफोन १६ मध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, तर आयफोन १६ प्लसमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय नवीन डिव्हाईसमध्ये ॲक्शन बटण आणि हार्डवेअर आधारित कॅमेरा कंट्रोल्सदेखील देण्यात आले आहेत. ॲपलच्या इन-हाउस ६ कोर सीपीयू आणि ५ कोर जीपीयूसह ३ एनएम ए १८ चिप्ससह, त्यांना विशेष ॲपल इंटेलिजेंस फीचरदेखील देण्यात आले आहेत, यामुळे गेमिंगसाठी व चांगल्या प्रकारच्या फोटो व्हिडीओसाठी याचा फायदा होणार आहे.

कॅमेरा फिचर

नवीन कॅमेरा कंट्रोल बटणामुळे वापरकर्त्यांना फोटो क्लिक करणे सोपे झाले आहे. हे बटण दाबल्यास कॅमेरा उघडतो. तसेच दीर्घ टॅपिंग केल्यावर थेट व्हिडीओदेखील रेकॉर्ड केला जाऊ शकतो. या फीचरमध्ये झूमसारखे पर्यायदेखील देण्यात आले आहेत व कॅमेरा नियंत्रणदेखील यात केले जाऊ शकते. वापरकर्त्यांना या बटणासह लाईट प्रेस आणि क्लिक दोन्ही पर्याय मिळणार आहेत. या फोनमध्ये ४८ मेगा पीक्सलसह मुख्य कॅमेरा आणि १२ मेगा पीक्सलसह अल्ट्रा-वाइड लेन्ससह ड्युअल ४८ मेगा पीक्सल फ्यूजन कॅमेरा सेटअप या उपकरणांचा समावेश आहे. मुख्य लेन्सचा वापर २x टेलिफोटो कॅमेरा आणि मॅक्रो लेन्स म्हणूनदेखील केला जाऊ शकतो. यात १२ मेगा पीक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

हेही वाचा >> Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर

iPhone 16 ची किंमत किती?

iPhone १६ चे ३ व्हेरियंट लॉन्च करण्यात आले आहे. १२८GB बेस मॉडेलची किंमत ७९, ९००रुपयांपासून सुरू होते. २५६GB मॉडेलची किंमत ८९,९०० रुपये आहे. तर ५१२GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत १०९,९००रुपये आहे.

iPhone 16 Plus ची किंमत किती?

आयफोन १६ प्लस तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. १२८GB बेस मॉडेलची किंमत ८९,९०० रुपयांपासून सुरू होते. २५६GB मॉडेलची किंमत ९९,९०० रुपये आहे, तर ५१२GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत १,१९,९०० रुपये आहे.

Story img Loader