Apple iPhone 17 Air To Be The First Portless iPhone : आयफोन कायमच ट्रेंडमध्ये असतो. या फोनमध्ये असणाऱ्या भन्नाट फीचर्समुळे हा फोन मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या पसंतीस पडतो. आता पुन्हा एकादा कंपनी ग्राहकांकरिता भन्नाट फीचर घेऊन येणार आहे. अलीकडच्या अहवालांनुसार, ॲपलने त्यांच्या आगामी आयफोन १७ एअरला (iPhone 17 Air) ला कंपनीचा पहिला पोर्ट-फ्री स्मार्टफोन बनवण्याची योजना आखली आहे. हे डिव्हाइस अल्ट्रा थिन असून त्यात यूएसबी-सी कनेक्टरसुद्धा असणार आहे.
ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी खुलासा केला की, ॲपलचा मूळ हेतू हा होता की, आयफोन १७ एअर पूर्णपणे पोर्ट-फ्री असावा, जो केवळ वायरलेस चार्जिंग आणि क्लाउड सिंकिंगवर अवलंबून असेल. पण, अलीकडेच अमेरिकन मॉडेल्समधील भौतिक सिम कार्ड स्लॉटसारख्या फीचर्सना काढून टाकण्याच्या ॲपलच्या ऐतिहासिक पद्धतीनंतर, ‘पोर्ट-फ्री आयफोन’ आयफोनमधील हा सर्वात मोठा बदल ठरेल, असे गुरमन यांनी सांगितले आहे. पण, त्यांनी हेही नमूद केले की, कंपनीचे पोर्ट-फ्री फीचरचे स्वप्न सोडून न देता पुढे ढकलले आहे.
कारण यूएसबी-सी पोर्ट काढून टाकल्याने युरोपियन युनियन रेग्युलेटर्सकडून उलटसुलट प्रतिक्रिया येतील अशी भीती ॲपलला वाटत होती, ज्यांनी अलीकडेच आयफोनचा लाइटनिंगवरून यूएसबी-सीवर स्विच करणे अनिवार्य केले आहे आणि ते ॲपलच्या व्यवसाय पद्धतींचे बारकाईने निरीक्षण करत आहेत.
iPhone 17 Air कॅमेरा
चार्जिंग पोर्ट ठेवला असला तरी आयफोन १७ एअरमध्ये ॲपलच्या स्मार्टफोन लाइनअपमध्ये अजूनही नाट्यमय बदल होतील. विश्वासार्ह ॲपल टिपस्टर सोनी डिक्सन यांनी लीक केलेल्या डमी मॉडेल्समध्ये अंदाजे आयफोन ६.६ इंचाचा डिस्प्ले, ४८ मेगापिक्सेलचा सिंगल रिअर कॅमेरा, नवीन A19 चिप सध्याच्या आयफोन्सच्या तुलनेत जास्त बॅटरी लाइफ राखण्यास मदत करेल.
ॲपलचे अधिकारी आयफोन १७ एअरला भविष्यातील डिझाइनसाठी एक चाचणी म्हणून पाहतात असे वृत्त आहे. जर ते यशस्वी झाले तर कंपनी त्यांच्या पोर्ट-फ्री महत्त्वाकांक्षेला पुन्हा एकदा पाहू शकते आणि २०२६ पर्यंत अपेक्षित असलेल्या फोल्डेबल आयफोनसह इतर मॉडेल्समध्ये स्लिमर डिझाइन लागू करू शकते.