दिवसेंदिवस वाढणाऱ्या तंत्रज्ञानामुळं मोठ्या बॅंड्सच्या फोनमध्ये एकाहून एक जबदरस्त फिचर्स येत असतात. मोबाईल फोन हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. विविध कंपन्यांचे स्मार्ट फोन वापरण्याची क्रेज वाढतच आहे. अशातच अनेकांना जगातील सर्वात मोठा ब्रॅंड समजल्या जाणाऱ्या अॅपल कंपनीचा iphone वापरणं अनेकांना आवडतं. कारण या फोनची खासीयतच वेगळी आहे. या फोनमध्ये असणारे भन्नाट फिचर्स वापरकर्त्यांना वेगळंच समाधान देऊन जातात. असंच एक उदाहरण एका घटनेच्या माध्यमातून समोर आलं आहे.
कोणताही फोन पाण्यात पडल्यावर खूप टेन्शन येतं. तसंच वॉटर-रेझिस्टंट फोन पाण्यात पडल्यावर काही मर्यादेपर्यंतच सुरक्षित राहतो. पण, एखादा फोन एका वर्षापर्यंत पाण्यात राहिला, तर काय होईल? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. असाच काहिसा प्रकार iphone 8 plus या फोनबाबत घडला आहे. विशेष म्हणजे हा फोन पाण्यात पडून एक वर्षांचा कालावधी झाल्यानंतरही व्यवस्थित सुरु होता. Apple iphones मध्ये जबरदस्त फिचर्स असतात. या फोनच्या किंमतीवरून अनेकदा कंपनीला ट्रोलही करण्यात येतं. परंतु, प्रीमियम फील आणि ब्रॅंड व्यल्यूच्या कारणामुळं iphone च्या विक्रीतही खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
१२ महिने समुद्राच्या पाण्यात राहिल्यानंतरही आयफोन व्यवस्थित सुरु झाला, अशी माहिती एका अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे. आयफोन वॉटर रेझिसस्टंट रेटिंगसोबत मिळतात. परंतु, याचीही मर्यादा असते. म्हणजेच खूप खोल पाण्यात फोन पडल्यानंतर आणि अधिक वेळ झाल्यानंतर आयफोन आणि इतर फोनची रेटिंग काम करत नाही. मात्र, पाण्यात पडलेला आयफोन एका वर्षांनतर सुरक्षित आहे, हे पाहिल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घनटा यूकेमध्ये घडली आहे. सन यूकेच्या रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, एका ब्रिटिश महिलेचा iphone 8 plus एक वर्षांपूर्वी समुद्रात पडला होता. पण जेव्हा तो फोन महिलेला परत मिळाला त्यावेळी तिला धक्काच बसला. कारण एका वर्षापासून समुद्राच्या पाण्यात असलेला फोन चांगल्या पद्धतीत काम करत होता.
एका वर्षांपूर्वी समुद्रात हरवला आयफोन
रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, iphone 8 plus हॅम्पशायर येथे राहणाऱ्या एका महिलेचा आहे. एका वर्षांपूर्वी त्यांचा फोन समुद्राच्या पाण्यात पडला होता. २०२१ मध्ये जेव्हा ती महिला पॅंडल बोर्डिंग करत होती, त्यावेळी समुद्रात तिचा फोन पडला होता. त्यानंतर हा फोन ब्रॅडली नावाच्या एका व्यक्तीला मिळाला आणि त्यांनी महिलेला याबाबत सांगितलं. फोन मिळाल्यानंतर त्यांना विश्वासच बसत नव्हता. आयफोन एका वॉटर प्रूफ बॅगमध्ये होता. पण तो समुद्राच्या खोल पाण्यातही सुरक्षित राहिला, हे पाहून महिलेला धक्काच बसला. समुद्रात सापडलेला iphone 8 plus चं बॅक साईड पूर्णपणे खराब झालं आहे, तरीही हा फोन ऑन होत असून व्यवस्थित काम करत आहे. यावर्षी कंपनीने iphone 14 लॉंच केलं आहे.