iphone at just 20000 in flipkart year end sale: आयफोन एकदा तरी वापरुन पहावं असं सर्वांनाच वाटतं. त्यामुळेच आयफोन कमी किंमतीत उपलब्ध असेल आणि फोन बदलण्याचा विचार असेल तर या प्रिमियम फोनला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. अनेकदा इच्छा असूनही केवळ किंमत जास्त असल्याने आयफोन विकत घेण्याचा विचार अनेकजण बाजूला ठेवतात. तर बरेचजण आयफोन विकत घेण्यासाठी ऑफर्सची किंवा ऑनलाइन सेल्सची वाट पाहतात. तुम्हीही असे वाट पाहणाऱ्यांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या इयर एण्ड सेलमध्ये ऑफर्स अंतर्गत आयफोन ११ वर मोठी सूट देण्यात आली आहे. अगदी कमी किंमतीत तुम्ही आयफोन विकत घेऊ शकता.

आयफोन ११ च्या ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ४३ हजार ९०० रुपये इतकी आहे. मात्र फ्लिपकार्टवरील सेलमध्ये यावर ३ हजार ९०१ रुपयांची सरसकट सूट म्हणजेच फ्लॅट डिस्काऊंट आहे. या सवलतीमुळे हा फोन ३९ हजार ९९९ ना विकत घेता येईल. तसेच फ्लिपकार्टवरुन अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर फोन घेतल्यास पाच टक्के अधिक सवलत मिळणार आहे. ही सूट जास्तीत जास्त दोन हजारांपर्यंत आहे.

drunken man was pelting the young man with a stone video goes viral
वर्धा : दारूडा ‘त्याला’ दगडाने ठेचत होता; लोकांची मात्र बघ्याची भूमिका! काही जण व्हिडिओ काढण्यात व्यग्र…
What exactly does the NTA organization which is in discussion due to the NET scandal do
‘नीट’, ‘नेट’ घोळामुळे चर्चेत असलेली ‘एनटीए’ संस्था नेमकी काय करते?
NCERT took the stand that there is no need to teach about riots in schools
दंगलींबाबत शाळांमध्ये शिकविण्याची गरज नाही; एनसीईआरटी
womans right to decide on abortion
गर्भपाताचा निर्णय घेण्याचा अधिकार महिलेचाच!
The limit of large fixed deposits in banks is now 3 crores
मोठ्या मुदत ठेवींची मर्यादा आता तीन कोटींवर
गावात राहावे कोण्या बळे?
गावात राहावे कोण्या बळे?
Deadline Extended for RTE Admissions, RTE Admissions, RTE Admissions Private Schools, Parents Get More Time to Apply rte, right to education, maharashtra news, pune news,
आरटीई प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत करता येणार अर्ज?
summer health tips heatwave what happens eating mangoes daily health benefits risks
रोज नाश्त्यामध्ये आंबा खाणे फायद्याचे की तोट्याचे? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला वाचाच

विशेष म्हणजे या फोनवर फ्लिपकार्टकडून एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. एक्सचेंज ऑफरअंतर्गत जुन्या फोनच्या मोबदल्यात जास्तीत जास्त १७ हजार ५०० रुपयांपर्यंतची सूट मिळेल. मात्र ही सर्वाधिक सूट जुन्या स्मार्टफोनची कंपनी, मॉडेल आणि फोनची स्थिती कशी आहे याबरोबरच ऑर्डर कोणत्या भागातून केली जाणार म्हणजेच डिलेव्हरी लोकेशनवरही अवलंबून आहे. त्यामुळेच या १७ हजार ५०० रुपयांपैकी किती पैसे कमी होणार हे कोणता फोन एक्सचेंज करणार यावर अवलंबून आहे. कंपनीने फक्त सर्वाधिक एक्सचेंज प्राइजची घोषणा केली आहे.

जर फ्लिपकार्टवरील ३९०१ रुपयांची सूट, क्रेडिट कार्डवर मिळणारी दोन हजारांची सूट आणि एक्सचेंजमध्ये सर्वाधिक सूट मिळाली तर आयफोन ११ केवळ २० हजार ४९९ रुपयांना विकत घेता येईल. आयफोन ११ मध्ये ६.१ इंचाचा लिक्विड रेटीना एचडी डिस्प्ले आणि ए १३ बायोनिक प्रोसेसर आहे.