iphone at just 20000 in flipkart year end sale: आयफोन एकदा तरी वापरुन पहावं असं सर्वांनाच वाटतं. त्यामुळेच आयफोन कमी किंमतीत उपलब्ध असेल आणि फोन बदलण्याचा विचार असेल तर या प्रिमियम फोनला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. अनेकदा इच्छा असूनही केवळ किंमत जास्त असल्याने आयफोन विकत घेण्याचा विचार अनेकजण बाजूला ठेवतात. तर बरेचजण आयफोन विकत घेण्यासाठी ऑफर्सची किंवा ऑनलाइन सेल्सची वाट पाहतात. तुम्हीही असे वाट पाहणाऱ्यांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या इयर एण्ड सेलमध्ये ऑफर्स अंतर्गत आयफोन ११ वर मोठी सूट देण्यात आली आहे. अगदी कमी किंमतीत तुम्ही आयफोन विकत घेऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयफोन ११ च्या ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ४३ हजार ९०० रुपये इतकी आहे. मात्र फ्लिपकार्टवरील सेलमध्ये यावर ३ हजार ९०१ रुपयांची सरसकट सूट म्हणजेच फ्लॅट डिस्काऊंट आहे. या सवलतीमुळे हा फोन ३९ हजार ९९९ ना विकत घेता येईल. तसेच फ्लिपकार्टवरुन अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर फोन घेतल्यास पाच टक्के अधिक सवलत मिळणार आहे. ही सूट जास्तीत जास्त दोन हजारांपर्यंत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphone at just 20000 in flipkart year end sale buy apple iphone with biggest offers scsg
First published on: 27-12-2022 at 12:38 IST