iPhone चे जबरदस्त फीचर म्हणजे खजिना आहे. तुम्ही रोज फोन जितका तपासून पाहाल तितक्या वेगळ्या आणि हटके सुविधा तुम्हालाही सापडतील. असंच एक भन्नाट फीचर सध्या समोर येत आहे. आपल्याला जर फोनमधील डॉक्युमेंट्स स्कॅन करायचे असतील तर तुम्हाला वेगळ्या कोणत्याही ऍपची आवश्यकता नाही कारण तुमच्या फोनमध्ये आधीच स्कॅनिंग अॅप उपलब्ध आहे. बरं फक्त स्कॅनरच नाही तर हे फीचर वापरून आपण हस्तलिखित नोट्सला डिजिटल मॅसेज मध्ये सुद्धा बदलू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कितीतरी वेळा असं होतं की आपण नोट्स मध्ये काहीतरी लिहून घेतलं असतं आणि मग पुन्हा ते टाईप करत बसण्याची वेळ येते. जेव्हा तुम्ही बाहेर असता तेव्हा प्रत्येक ठिकाणी लॅपटॉप घेऊन जाणं शक्य नसतं. सरकारी ऑफिसात अर्ज द्यायचा झाला तर अनेक ठिकाणी हार्डकॉपी म्हणजे हस्तलिखित अर्जच द्यावा लागतो पण मग तुमच्याकडे काही पुरावा राहत नाही. विशेषतः कॉलेज लेक्चर जिथे तुम्हाला मोबाईल वापरण्याची परवानगी नसते तिथे तुम्ही वहीवर लिहून घेता पण नंतर तुम्हाला याचे ऑनलाईन नोट्स बनवण्यासाठी पुन्हा मेहनत घ्यावी लागते. ही मेहनत वाचवण्यासाठी आपण आयफोनचे हे नवे फीचर वापरू शकता.

(भर मीटिंगमध्ये डेटिंग अॅप वापरू शकता; बॉसला चकवण्यासाठी टिंडरचं नवं फीचर)

हे फीचर वापरून तुम्ही थेट कॅमेराने तुमच्या हस्तलिखित नोट्स स्कॅन करून त्याचे डिजिटल मजकुरात रूपांतर करू शकता. यासाठी खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स लक्षात घेऊयात..

  • तुमच्या iPhone वर ‘नोट्स’ अॅप उघडा
  • नवीन नोट तयार करा किंवा अगोदरच असलेली एक नोट उघडा.
  • एक अक्षर टाइप करा आणि नंतर तुम्हाला कॅमेरा चिन्ह खाली दिसेल.
  • कॅमेरा आयकॉनवर टॅप करा आणि नंतर “स्कॅन टेक्स्ट” पर्यायावर टॅप करा.
  • कॅमेरा उघडेल. कॅमेरा तुमच्या लिखित मजकुराकडे निर्देशित करा.
  • मजकूर पूर्णपणे ओळखण्यासाठी कॅमेरा काही सेकंद घेईल.
  • मजकूर स्पष्ट दिसल्यावर कॅप्चर मेनूवर टॅप करा.
  • तुमची हस्तलिखित नोट नोट्स अॅपमध्ये डिजिटल मजकूर म्हणून प्रविष्ट केली जाईल.

त्याचप्रमाणे, तुम्ही एखादे दस्तऐवज स्कॅन करून तुमच्या नोट्स अॅपमध्ये टाकू शकता, यासाठी…

  • “स्कॅन टेक्स्ट” पर्यायाऐवजी, तुम्हाला “स्कॅन डॉक्युमेंट” पर्यायावर टॅप करावे लागेल.
  • कॅमेरा स्कॅन डॉक्युमेंट पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर हवं तसे क्रॉप करा.

तूर्तास हे फीचर फक्त iOS 15.4 आणि iPadOS 15.4 वर चालणाऱ्या iPhones मध्ये उपलब्ध असेल. दरम्यान iPhone चे नवनवीन फीचर हे दर दिवशी अपडेट होत असतात. येत्या ७ सप्टेंबरला iPhone १४ कोणते नवे धमाकेदार वैशिष्ट्य घेऊन येत आहे हे पण बघूच. तोपर्यंत हा स्कॅनर तुमच्या कामी येतोय का हे नक्की तपासून पहा.