जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी Apple ने या आठवड्यात आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘Apple iPhone SE 2022’ लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चमुळे ‘Apple iPhone SE 2020’ च्या किंमतींमध्ये आता मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. ई-कॉमर्स फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या बेसिक ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत सुमारे २९,९९९ पासून सुरू होत आहे तर इतर दोन व्हेरिएंट १२८ जीबी आणि २५६ जीबीची किंमत ३४,९९९ आणि ४४,९९९ आहे. हा स्मार्टफोन Apple ने २०२० मध्ये ४४,५०० च्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च केला होता.
Flipkart वर मिळतेय ऑफर: तुम्ही Apple iPhone SE वर फ्लिप कार्डद्वारे इतर सवलतींचा लाभ देखील घेऊ शकता. जर तुमच्याकडे Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला MRP वर ५ % सूट मिळेल. तुम्ही तुमच्या जुन्या फोनसोबत हा Apple iPhone SE एक्सचेंज केल्यास तुम्हाला १३,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. त्यानंतर तुम्ही हा स्मार्टफोन अगदी स्वस्तात तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. Apple iPhone SE फ्लिपकार्टवर ब्लॅक, रेड आणि व्हाईट या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
आणखी वाचा : या फीचरमुळे Instagram Reels तयार करणे सोपे होईल, फॉलोअर्स वाढविण्यातही मदत होईल
स्पेसिफिकेशन्सची फिचर्स: जर या दुसऱ्या पिढीच्या Apple iPhone SE 2020 बद्दल बोलायचं झालं, तर या स्मार्टफोनमध्ये ४.७ इंचाचा रेटिना HD डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले ट्रू टोन फिचर्ससह येतो, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या सभोवतालच्या प्रकाशानुसार व्हाईट बॅलन्स अॅडजस्ट करू शकता. हा स्मार्टफोन A13 बायोनिक चिपसह येतो, जो पहिल्यांदा Apple च्या उच्च-बजेट फोन iPhone 11 आणि iPhone 11 Pro सह लॉन्च करण्यात आला होता.
या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन १८ W चार्जिंग सपोर्टसह येतो. यासोबत तुम्हाला वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्टही मिळतो.
पाणी आणि धूळ पासून संरक्षण: Apple iPhone SE 2020 चे सर्वात मोठे फिचर्स म्हणजे या स्मार्टफोनवर धूळ आणि पाण्याचा कोणताही प्रभाव नाही. हा स्मार्टफोन Apple च्या ऑपरेटिंग सिस्टम १५ सह येतो, ज्यामुळे हा एक अतिशय सोयीचा स्मार्टफोन बनतो.