iPhone SE 4 Launch Tomorrow : ॲपलचा फोन तेही स्वस्तात? ऐकून धक्का बसला ना… एखाद्या डिस्काउंट किंवा सेलमध्ये सहसा आपल्या सगळ्यांनाच आयफोन अगदी कमी पैशात खरेदी करता येतो. तुम्ही जर आयफोनचे चाहते असाल, तर तुम्हाला सर्वांत कमी किमतीत असलेला हा आयफोन लवकरच खरेदी करता येणार आहे. ॲपलचा चौथ्या जनरेशनचा iPhone SE या महिन्यात अधिकृतपणे लाँच होणार आहे.
आयफोन एसई ४ (IPhone SE 4) या आठवड्यात म्हणजेच उद्या ११ फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. ॲपलने त्यांच्या परवडणाऱ्या आयफोनसाठी काय प्लॅन बनवला आहे याबद्दलची उत्सुकता आता अखेर संपणार आहे. तर आयफोन एसई ४ चे डिझाईन, स्पेसिफिकेशन व फीचर्स कसे असणार आहेत याबद्दल जाणून घेऊया…
आयफोन एसई ४ (iPhone SE4) मध्ये आयफोन १४ प्रमाणे डिझाइन असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये ऑल डिस्प्ले, फ्रंट पॅनेलसह नॉच ऑन टॉप मिनम आणि ग्लास बिल्ड व्हॉल्यूम व म्यूट बटण आहे. पण, यूएसबी-सी चार्जिंग पोर्ट्ससह काही अपग्रेड देण्यात आलेले नाही. स्टार्टफोन ६.१ इंच एचडी डिस्प्ले आणि सीडी डिस्प्ले टेक्नॉलॉजीमधील अपग्रेड देऊन एक ace ID अनलॉकिंग सिस्टीम दिली जाणार आहे.
कमी खर्चात पॉवरफुल परफॉर्मन्स
परफॉर्मन्सबद्दल सांगायचे झाल्यास, आयफोन एसई ४ मध्ये (iPhone SE4) A18 चिप व ८ जीबी रॅम असणार आहे. हे फ्लॅगशिप iPhone 16 मध्येसुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही कमी खर्चात पॉवरफुल परफॉर्मन्सची अपेक्षा करू शकता. त्याव्यतिरिक्त Apple iPhone SE 3 प्रमाणे ६४ जीबी स्टोरेजऐवजी १२८ जीबी स्टोरेज पर्याय देऊ शकते. तसेच Apple ॲपल नवीन इन-हाउस ५ जी मोड आणू शकेल, असे सांगण्यात येत आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास आयफोन सिंगल रिअर कॅमेरा 48MP रिझोल्युशनसह आणि 12MP फ्रंट कॅमेरा, स्मार्टफोनला iPhone 14 सारखीच बॅटरी, जी २० तासांपर्यंत टिकून राहील आदी अनेक फीचर्स असणार आहेत.