iPhone चे SE हे मॉडेल आता रद्द होण्याची शक्यता आहे असे विश्लेषक मिंग ची-कुओ यांनी सांगितले. गेल्या महिन्यातील एक अहवालामध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. iPhone चे नेक्स्ट मॉडेल रद्द किंवा लाँच होण्यास उशीर होऊ शकतो. मात्र आता हे मॉडेल जवळजवळ स्क्रॅप करण्यात आलेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Apple ने २०२४ मध्ये इन-हाऊस ५ जी चिप लाँच करण्याची आणि SE ४ ऍडॉप्ट करण्याची तयारी केली होती असे विश्लेषक मिंग ची-कुओ यांनी सांगितले. iPhone SE 4 रद्द केल्यामुळे Qualcomm कडून बेसबँड चिपचा वापर करणे सुरु राहणार आहे.

हेही वाचा : CES 2023: जगातील प्रमुख कंपन्यांनी केले नवीन लॅपटॉप्सचे लाँचिंग; जाणून घ्या भन्नाट फीचर्स

कुओच्या अनुमानानुसार जर ही सिरीज कॅन्सल झाली असेल किंवा स्क्रॅप होण्याची बातमी खरी असेल तर, Qualcomm २०२३ आणि २०२४ पर्यंत जागतिक हाय एन्ड स्मार्टफोन RF (रेडिओ फ्रिक्वेन्सी) मार्केटवर वर्चस्व राखू शकेल. त्यामुळे त्यांना प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त प्रॉफिट होऊ शकतो. आयफोन SE ४ सिरीज रद्द होणे किंवा स्क्रॅप होणे हे खूप त्रासदायक गोष्ट आहे. अ‍ॅप्पलची तिसरी SE जनरेशन ही दोन वर्षांनी आणि पहिल्या सीरिजनंतर ४ वर्षांनी आली. यानंतर पुढची सिरीज कधी लाँच होईल हे सांगता येत नाही.