गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाने इतका वेग घेतला आहे की, रोज नवे गॅझेट समोर येत असतात. सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन असतोच. करोना काळात तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा झाला. लॉकडाउन, आयसोलेशनच्या काळात स्मार्टफोनने मोलाची साथ दिली. असं असताना करोना काळात एक समस्या आयफोन स्मार्टफोनधारकांना वारंवार सतावत होती. फोन अनलॉक करण्यासाठी मास्क खाली घ्यावं लागत होतं. करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क लावणं गरजेचं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क काढणं धोक्याचं ठरू शकतं. मास्क लावून चेहऱ्याने आयफोन अनलॉक करण्यात लोकांना अडचणी येत आहेत. मास्क घातल्याने आयफोन चेहरा ओळखत नाही. त्यामुळे आयफोन अनलॉक करणे कठीण होतं. ही अडचण लक्षात घेत अॅपलने आयफोनसाठी नवीन आयओएस १४.५ अपडेट जारी केले आहे. अॅपलने निवेदनात सांगितलं आहे की, युजर्संना मास्क असताना फेस आयडी वापरून त्यांचे आयफोन अनलॉक करण्याची परवानगी देणारे नवीन वैशिष्ट्य केवळ आयओएस १४.५ साठीच आहे. हा अपडेट आयफोन १२, १२ मिनी, १२ प्रो आणि १२ प्रो मॅक्स आणि आयफोन १३, १३ मिनी, १३ प्रो आणि १३ प्रो मॅक्सवर उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा