Five settings on your iPhone to take your photos: एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर तिथे जाऊन आपण फोटो काढले नाहीत, असं कधीच होणार नाही. ग्रुपमध्ये ज्याच्या मोबाईलचा कॅमेरा चांगला असेल, त्याच्या फोनमध्ये सगळ्यात जास्त फोटो काढले जातात. तसेच जर हा फोन आयफोन असेल, मग तर काही बघायलाच नको. कारण- आयफोन हा कॅमेऱ्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे. पण, काही नवीन युजर्सना आयफोनमध्ये काय सेटिंग करावी? चांगले फोटो काढण्यासाठी कॅमेरा सेट कसा करावा याची कल्पना नसते. जर तुम्ही आयफोन युजर्स असाल, तर कॅमेऱ्याचा अनुभव वाढवण्यासाठी तुम्ही पुढील पाच सेटिंग्ज बदलू शकता.

ग्रिड आणि लेव्हल पर्याय सक्षम करा

iPhone वर शूटिंग करताना तुम्हाला फ्रेम तयार करण्यात अडचण येत असल्यास, सेटिंग्जमधून ग्रिड आणि लेव्हल पर्याय सक्षम करा. हा पर्याय तुमच्या iPhone वर एखादे दृश्य उत्तम प्रकारे फ्रेम आणि कॅप्चर करण्यास मदत करील. तुम्ही हा पर्याय सक्षम केला की, कॅमेरा व्ह्युफाइंडर स्क्रीनवर ग्रिड आणि लेव्हल पर्याय दाखवेल; ज्यामुळे एखादा विषय फ्रेम करणे सोपे होईल.

Tesla Human Robot
Tesla Job Offer: ७ तास चालण्यासाठी टेस्ला कंपनी देणार एका दिवसाचे २८ हजार रुपये
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”
canada changes in immigration policy
कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतीयांना धक्का; आता कॅनडात नोकरी मिळणे कठीण; कारण काय?
jio Choice Number scheme will help you to customised phone number
तुमच्या आवडीनुसार Jio चा मोबाईल नंबर निवडायचा आहे? फक्त ‘या’ स्टेप्स करा फॉलो; कोणासाठी असणार ‘ही’ ऑफर?
iPhone 16 Design & Colour Options
iPhone 16 ‘या’ पाच कलर ऑप्शन्ससह येणार? कॅमेरा, डिस्प्ले, डिझाइनबद्दल ‘ही’ माहिती जाणून घ्या
Butch Wilmore and Sunita Williams
Sunita Williams Return Date: सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढला; धोका असल्याची नासाची कबुली

ऑटो फ्लॅश बंद करा

प्रकाशाच्या परिस्थितीनुसार ऑटो फ्लॅश ऑन /ऑफ करण्यासाठी आयफोन स्मार्ट आहेत. जर तुम्हाला नैसर्गिक फोटो काढायचा असेल, तर iPhone वर ऑटो फ्लॅश पर्याय बंद करा. कारण- ऑटो फ्लॅश कमी प्रकाशातसुद्धा चित्रे कॅप्चर करताना आपोआप ऑन होतो आणि त्यामुळे फोटोची नैसर्गिकत सुद्धा कमी होते.

हेही वाचा…iPhone 16 ‘या’ पाच कलर ऑप्शन्ससह येणार? कॅमेरा, डिस्प्ले, डिझाइनबद्दल ‘ही’ माहिती जाणून घ्या

मिरर फ्रंट कॅमेरा ऑन करा

आपल्यातील अनेकांना सेल्फी काढायला प्रचंड आवडते. ज्यांना आरशात जशी स्वत:ची प्रतिमा दिसते, त्यासारख्याच सेल्फी (मिरर सेल्फी) घ्यायला आवडतात, त्यांनी मिरर फ्रंट कॅमेरा पर्याय ऑन केला पाहिजे. पण, एक समस्या आहे आणि ती म्हणजे तुमच्या कपड्यांवर लिहिलेला मजकूर यात उलटा दिसेल.

फास्ट शूटिंग ऑन करा

faster shooting ऑन केल्याने तुमचा iPhone कमी वेळेत जास्त फोटो कॅप्चर करू शकतो. या फीचरच्या मदतीने तुमचे फोटो उठून दिसतील आणि नैसर्गिकही वाटतील.

लेन्स करेक्शन ऑन करा

ज्यांना त्यांच्या आयफोनवर अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्सने लँडस्केप फोटो कॅप्चर करण्यात आनंद वाटतो त्यांच्यासाठी लेन्स करेक्शन फीचर उत्तम ठरेल. हे फीचर बहुतेक नवीन iPhones वर उपलब्ध आहे.

तर अशा प्रकारे उत्तम फोटोज काढण्यासाठी तुम्ही या पाच सेटिंग्जमध्ये बदल करू शकता.