क्रिकेट म्हटलं की भारतीयांचा जीव की प्राण. गल्ली, रस्ते, मैदानात क्रिकेट खेळताना तुम्ही अनेकांना पाहिले असतील. तुम्ही स्वत:ही क्रिकेट खेळला असाल. त्यामुळे भारतीयांसाठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे सण असतो. लवकरच भारतात आयपीएल २०२२ स्पर्धा सुरु होणार आहे. यंदाच्या हंगामात १० संघ स्पर्धेत असणार आहेत. आयपीएल २०२२ स्पर्धा २६ मार्चपासून २९ मे पर्यंत असणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील उत्कंठा वाढवणारे सामने पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुर आहे. चालता फिरता मॅच बघता यावी यासाठी चांगल्या प्लानच्या शोधात आहेत. आयपीएल २०२२ लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टारवर केले जाणार आहे. याचा अर्थ असा, तुम्ही डिस्ने + हॉटस्टारद्वारे तुमच्या फोनवर कधीही, कुठेही सामन्याचा आनंद घेऊ शकता. यासाठी, तुम्ही डिस्ने + हॉटस्टार मोफत सबस्क्रिप्शन देणार्या योजना घेऊ शकता. Jio, Airtel आणि Vi च्या अशा योजनांची माहिती देणार आहोत, जिथे डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन आणि अनेक फायदे मिळतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा