IPL 2024: बहुप्रतीक्षित इंडियन प्रीमियर लीग (IPL) आयपीएलला आजपासून सुरुवात होणार आहे. आपल्या आवडत्या संघाच्या मॅच पाहण्यासाठी टीव्ही, स्मार्टफोन्सवरून चाहत्यांची नजर हटणार नाहीये. जर तुम्ही हे सामने (मॅच) तुमच्या स्मार्टफोन्सवर बघणार असाल तर तुम्हाला उत्तम कनेक्टिव्हिटी आणि डेटा पॅकची आवश्यकता आहे. तर या आयपीएल सीजनमध्ये तुमच्या डेटा पॅकच्या कमतरतेमुळे तुमचा उत्साह कमी होऊ देऊ नका. कारण वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) म्हणजेच व्हीआय आयपीएल २०२४ साठी काही आकर्षक ऑफर्स ग्राहकांसाठी घेऊन आला आहे.
टेलिकॉम कंपनी व्हीआयने डेटा प्लॅन्सवर काही डिस्काउंट आणि अतिरिक्त डेटा प्लॅन्सची घोषणा केली आहे. आयपीएलच्या मजा द्विगुणित करणाऱ्या ऑफर्सवर एक नजर टाकू या.
पहिला डेटा पॅक –
पहिल्या प्लॅनची किंमत १,४४९ रुपये आहे आणि या प्लॅनचा कालावधी १८० दिवसांचा आहे. दररोज १.५ जीबी डेटा आणि अमर्यादित कॉल ऑफर करतो. या पॅकेजमध्ये ग्राहकांना ५० रुपयांची सूटदेखील देण्यात आली आहे.
हेही वाचा…मधमाश्यांच्या पोळ्यातून कसा काढला जातो मध? VIDEO पाहून अंगावर येतील शहारे; म्हणाल, ‘मेहनत…’
दुसरा डेटा पॅक –
दुसऱ्या ऑफरची किंमत ३,१९९ रुपये आहे. या प्लॅनचा कालावधी ३६५ दिवसांचा असून दररोज २ जीबी डेटा प्रदान करतो. अमर्यादित व्हॉइस कॉल आणि एका वर्षासाठी अमेझॉन प्राईम व्हिडीओ मोबाइल एडिशन (Amazon Prime Video Mobile Edition) मध्ये प्रवेश यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. या पॅकेजवर ग्राहकांना १०० रुपयांची सूटही देण्यात आली आहे.
तिसरा डेटा पॅक –
तिसरा डेटा प्लॅन सर्वात स्वस्त आणि मस्त आहे. ६९९ रुपयांचा हा प्लॅन दिवसाला ३ जीबी डेटा प्रदान करेल आणि याचा कालावधी ५६ दिवसांचा असेल. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि ५० रुपयांची सवलतही ग्राहकांना देण्यात आली आहे.
याशिवाय व्हीआय ॲपच्या १८१ रुपयांच्या डेटा पॅकवर ग्राहकांना ५० टक्के अतिरिक्त डेटा, ७५ रुपयांच्या पॅकवर २५ टक्के अतिरिक्त डेटादेखील देत आहे. या ऑफरसह वापरकर्त्यांना २९८ रुपयांच्या पॅकवर (२८ दिवस) ५० जीबी डेटा आणि ४१८ रुपयांच्या पॅकवर (५६ दिवस) १०० जीबी डेटा मिळू शकतो. प्रीपेड ग्राहकांना १,४४९ रुपयांच्या डेटा पॅकवर मोफत ३० जीबी डेटा देण्यात येईल. शिवाय ग्राहकांना २,८९९; ३,०९९ आणि ३,१९९ या रिचार्ज पॅकवर ५० जीबीचा अतिरिक्त मोफत डेटा मिळणार आहे. अतिरिक्त डेटा ऑफर २१ मार्च २०२४ ते १ एप्रिल २०२४ पर्यंत सर्व प्रीपेड ग्राहकांसाठी वैध आहे. तसेच ही बाब लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, व्हीआयने जाहीर केलेल्या डेटा प्लॅन्स फक्त आणि फक्त Vi ॲप वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आहेत.