काही काळापूर्वीच iQOO ने iQOO १२ या नव्या हाय एण्ड स्मार्टफोनची ओळख भारतामध्ये करून दिली होती. त्याचप्रमाणे iQOO ची प्रतिस्पर्धी कंपनी वन प्लसने चायनामध्ये आपल्या वन प्लस १२ हे स्मार्टफोनचे मॉडेल अधिकृतरीत्या लाँच केले होते. आता हाच फोन भारतात येणार असला तरीही ग्राहकांनी iQOO 12 आणि OnePlus 12 या दोन्ही स्मार्टफोनची तुलना करण्यास सुरुवात केलेली आहे. हाय-एण्ड स्मार्टफोन, उच्च दर्जाचे फीचर्स व भन्नाट स्पेसिफिकेशन्स यांमुळे ज्यांना टेक विश्वाची आवड आहे, अशांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची ताकद या दोन्ही फोन्समध्ये असल्याचे इंडिया टुडेच्या एक लेखावरून समजते. अशा या दोन्ही भन्नाट फोनची फीचर्स आणि खासियत काय आहे ते पाहा.

iQOO 12 आणि OnePlus 12 फोनचे काय आहेत फीचर्स?

१. डिझाईन

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

iQOO 12 आणि OnePlus 12 हे दोन्हीही फोन दिसायला अतिशय स्टायलिश आहेत. कारण- या फोनमध्ये मजबूत काच आणि मेटलचा वापर केला गेला आहे; ज्यामुळे दोन्ही फोन दिसायला भक्कम व सुंदर आहेत. iQOO 12 या फोनमध्ये पँथर ब्लॅक, नेब्युला ब्ल्यू आणि व्हाइट सिल्व्हर असे भन्नाट रंग उपलब्ध असणार आहेत. तर वन प्लस १२ मध्ये झेड ब्लॅक, अॅस्ट्रल ग्रीन व मिस्टी व्हाइट असे विविध रंग उपलब्ध असतील.

हेही वाचा : व्हॉट्सॲपवरील महत्त्वाचे चॅट्स कसे ठेवाल डोळ्यांसमोर? जाणून घ्या मेटाने आणलेल्या ‘या’ नव्या फीचरबद्दल….

२. परफॉर्मन्स

iQOO 12 आणि OnePlus 12 हे दोन्हीही फोन पॉवर्डबाय क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ [Qualcommm Snapdragon 8 Gen 3] असणार आहेत. त्यासोबतच सध्याचे नवीन तंत्रज्ञान या फोन्समध्ये असल्याने ते अतिशय सुरळीतपणे काम करण्यास सक्षम आहेत. तुम्ही गेम्स खेळात असाल, काम करीत असाल किंवा दैनंदिन आयुष्यात फोनचा वापर करणार असाल, तरीही हे फोन्स अतिशय सुरळीत काम करू शकतात. या फोनमध्ये असणाऱ्या हायफंडू Kryo 780 CPU व Adreno 730 GPU जणू या फोनसाठी मेंदू आणि स्नायूंसारखे आहेत; जे फोन जलद व व्यवस्थित काम करतो आहे याची खात्री करीत असतात.
iQOO 12 या फोनचा रॅम १६ जीबी इतका असून, वन प्लस १२ चा रॅम २४ जीबी एवढा आहे. जास्त रॅम असल्यास तुमच्या फोनचा वेग कमी न होता, फोन जास्त प्रमाणामध्ये अॅप्स आणि इतर कामे सांभाळू शकतो.

३. कॅमेरा

iQOO 12 : या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे; ज्यामुळे फोटो अतिशय स्पष्ट येतात. त्यासोबतच ६४ मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यामुळे तुम्ही कितीही झूम केलेत तरीही फोटोची क्वालिटी खराब होत नाही. या सर्वांसोबत ५० मेगापिक्सेलचा अजून एक अल्ट्रावाइड कॅमेरासुद्धा दिलेला आहे; ज्यामधून तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणावर वाईड फोटो काढू शकता.

वन प्लस १२ : या फोनमध्येदेखील ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून, सोबत ४८ मेगापिक्सेल अल्ट्रावाFड कॅमेरा मिळणार आहे. त्यासोबत ६४ मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरासुद्धा उपलब्ध असणार आहे. मात्र, iQOO 12 फोनमधील अल्ट्रावाइड आणि टेलीफोटो कॅमेरा तुलनेने अधिक चांगला असल्याचे समजते.

असे असले तरीही वन प्लसने उत्तम कॅमेरा बनवणाऱ्या हॅसलब्लेड [Hasselblad] नावाच्या कंपनीसोबत आपल्या कॅमेऱ्यावर काम केले असल्याचे इंडिया टुडेच्या एका लेखातून समजते. त्यामुळे कदाचित वन प्लस १२ फोनच्या कॅमेऱ्यामध्ये अजूनही काही विशेष फीचर्स असण्याची शक्यता आहे.

बॅटरी

दोन्हीही फोनच्या बॅटरीज अगदी तगड्या आहेत. तुम्ही कितीही फोन वापरलात तरीही त्या सहज पुरू शकतात. iQOO 12 फोनमध्ये ५०००mAh बॅटरी असून, त्यापेक्षा थोडी अधिक बॅटरी म्हणजेच ५४००mAh इतकी शक्तिशाली बॅटरी वन प्लस १२ मध्ये असल्याचे समजते.

हेही वाचा : फोन, लॅपटॉप किती वेगाने चार्ज होतोय हे ‘या’ केबलवरून समजणार; पाहा काय आहे याची किंमत आणि खासियत….

त्यासोबत हे फोन किती वेगाने चार्ज होतात तेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. iQOO 12 या फोनमध्ये एक विशेष गोष्ट आहे आणि ती म्हणजे १२०W फ्लॅश चार्जिंग. त्यामध्ये तुमचा फोन ० ते १०० टक्क्यांपर्यंत केवळ १५ मिनिटांमध्ये चार्ज होणार आहे. याचा वेग खरोखरच प्रचंड आहे; परंतु वन प्लसचे तसे नाही. वन प्लस १२ मध्ये असणाऱ्या १००W सुपर VOOC चार्जिंगमुळे हा फोन ० ते १०० टक्के चार्ज होण्यासाठी २५ मिनिटांचा अवधी घेतो. असे असले तरीही हा वेग इतरांच्या तुलनेत जास्तच आहे.

त्यासोबतच हे दोन्हीही फोन इतर गॅजेट्सना चार्ज करू शकतात तेसुद्धा वायरलेस. त्यामुळे तुम्हाला इयरबड्स किंवा इतरांचा फोन चार्ज करायचा असल्यास फार सोईचे होते.

निकाल

या दोन्ही फोनची तुलना केल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या आहेत. त्यानुसार फोन निवडावा. तुम्हाला जर फास्ट चार्जिंग आणि इतर गोष्टी हव्या असतील, तर iQOO 12 हा फोन चांगला आहे. जर तुम्हाला अधिक रॅम हवा असल्यास किंवा यासारखी इतर फीचर्स आवडली असल्यास तुम्ही वन प्लस १२ ची निवड करू शकता. दोन्हीही फोनची तुम्ही पुन्हा तुलना करून बघा आणि मग तुमच्या आवडीनुसार कोणता फोन तुमच्यासाठी योग्य ठरेल ते पाहा.