iQOO ही एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स भारतीय बाजारामध्ये लॉन्च करत असते. iQOO कंपनी लवकरच आपला आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 12 भारतात लॉन्च करणार आहे. आगामी फोनमध्ये Qualcomm’s स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटचा सपोर्ट दिला जाणार आहे. या चिपसेटचा सपोर्ट असणारा देशातील हा पहिला स्मार्टफोन असणार आहे. तर हा फोन भारतात कधी लॉन्च होणार आहे आणि यामध्ये काय-काय फीचर्स असणार आहेत, त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा फोन १२ डिसेंबर रोजी भारतात लॉन्च होणार आहे. याबद्दलची माहिती iQOO इंडियाचे सीईओ निपुण मार्या यांच्याकडून प्राप्त झाली आहे. निपुण मार्या यांनी नुकतेच एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करत या फोनच्या लॉन्चिंगच्या तारखेची घोषणा केली आहे. iQOO १२ च्या पोस्टरमध्ये वरील उजव्या कोपऱ्यात BMW चा लोगो देखील आहे.

हेही वाचा : लवकरच लॉन्च होणार विवोची X100 सिरीज; ५३ मेगापिक्सलचा कॅमेरा, पेरिस्कोप लेन्ससह मिळणार…, जाणून घ्या

GSMArena च्या रिपोर्टनुसार, iQOO 12 या आगामी लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये एक असा डिस्प्ले दिला जाइल, ज्यात हार्डवेअरवर आधारित रे-ट्रेसिंगचा सपोर्ट असू शकतो.

या वर्षाच्या सुरुवातीला लोकप्रिय टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने Weibo वर या फोनबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टवर, फोनमध्ये QHD E7 OLED स्क्रीन मिळू शकते. ज्याचा रिफ्रेश रेट हा १४४ Hz इतका असेल. तसेच पोस्टमधील माहितीनुसार, फोनमध्ये मेटल फ्रेम, अल्ट्रासॉनिक इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर व २०० W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह लॉन्च होऊ शकतो. काही अन्य रिपोर्टनुसार, iQOO आपल्या फोनमध्ये चार्जिंग सपोर्ट हा १२०W पर्यंत मर्यादित ठेवू शकतो. तसेच यामध्ये ६००० mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकते. iQOO 12 च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यामध्ये OIS सह ५० मेगापिक्सलचा Omnivision कॅमेरा, ५० मेगापिक्सलचा ISOCELL JN1 चा अल्ट्रावाइड सेन्सर आणि ६४ मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्सचा समावेश आहे. हा फोन आऊट ऑफ बॉक्स अँड्रॉइड १४ वर आधारित असू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iqoo 12 launch 12 december in india with 6000 mah battery and qualcomm snapdragon 8 gen 3 powerful chipset tmb 01
Show comments