iQOO ही एक लोकप्रिय मोबाइल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स बाजारपेठेमध्ये लॉन्च करतच असते. त्यात ग्राहकांना नवीन फीचर्स आणि अपडेट्स मिळत असतात. iQOO कंपनीने भारतामध्ये आपला Neo 7 Pro 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. स्मार्टफोनचे मुख्य आकर्षण फोनमध्ये असलेला कॅमेरा सेटअप, स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट, १२० W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि लेदर बॅक डिझाईन हे आहे.

iQOO Neo 7 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO Neo 7 Pro मध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले मिळणार आहे. ज्याला १२० Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. या डिस्प्लेमध्ये फुल एचडी + रिझोल्युशन ऑफर करते. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटला सपोर्ट करतो. यामध्ये फोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांना १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ऑफर केले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित FuntouchOS 13 वर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!

हेही वाचा : अमेरिकेतील ‘ही’ कंपनी भारतात करणार तब्बल ३०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक

वर म्हटल्याप्रमाणे या फोनचा कॅमेरा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी १२०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, iQOO Neo 7 Pro 5G ची बॅटरी ८ मिनिटात ५० टक्के तर ३० मिनिटांमध्ये १०० टक्के चार्ज होऊ शकते.

हेही वाचा : VIDEO: Twitter ने लॉन्च केले युट्युब आणि व्हॉट्सअ‍ॅपसारखे ‘हे’ भन्नाट फिचर, व्हिडीओचा घेता येणार आनंद

iQOO Neo 7 Pro 5G किंमत आणि ऑफर्स

iQOO Neo 7 Pro 5G हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपयांमध्ये करण्यात आली आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये इतकी आहे. ग्राहक हा फोन Fearless Flame (ऑरेंज) आणि Dark Storm (निळा) या रंगांमध्ये खरेदी करू शकतात. तसेच या फोनची विक्री १५ जुलैपासून Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच तो कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध असेल.

कंपनीने लॉन्च केलेल्या या नवीन फोनच्या दोन्ही व्हेरिएंटवर खरेदीदारांना ICICI बँक आणि SBI बँक कार्डवर २ हजार रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळेल. तसेच दोन्ही मॉडेल्सवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो.

Story img Loader