iQoo Z10 5G Launch Date, Price And Features : बाजारात नेहमी नवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. यात आता अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला iQOO चा नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच होत आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत या स्मार्टफोनचे नाव, लाँच डेट आणि बॅटरीसह इतर फीचर्सबाबत सविस्तर माहिती शेअर केली आहे. कंपनी हा नवा स्मार्टफोन IQOO Z10 या नावाने लाँच करणार आहे. हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

कंपनी ११ एप्रिल रोजी एक नवीन फोन लाँच करणार आहे. यामध्ये युजर्सना 7300 mAh ची जबरदस्त बॅटरी मिळणार आहे.

iQOO Z10 5G चे स्पेसिफिकेशन्स

iQOO ने अद्याप अधिकृतपणे Z10 5G या स्मार्टफोनबाबत कोणतेही स्पेसिफिकेशन्स जाहीर केले नाही, परंतु स्मार्टप्रिक्सच्या एका अहवालात या स्मार्टफोन डिव्हाइसबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. iQOO Z10 5G मध्ये ६.६७ इंचाचा क्वाड-कर्व्हड AMOLED डिस्प्ले असू शकतो, ज्याचा २४०० × १०८० पिक्सेल रिझोल्यूशन आणि रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. डिस्प्ले पीक ब्राइटनेस २००० निट्सपर्यंत असू शकतो. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7s Gen 3 चिपसेटने सुसज्ज असेल. याशिवाय ८ जीबी/१२ जीबी रॅम आणि १२८ जीबी/२५६ जीबी स्टोरेजचा पर्याय असेल.

कॅमेरा आणि बॅटरी

iQOO Z10 5G मध्ये 50MP Sony IMX882 सेन्सर (OIS सपोर्टसह) असणार आहे, तर 2MP चा सेकंडरी सेन्सर असेल तर 32MP चा सेल्फी कॅमेरा असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,3000mAh बॅटरी असेल, जी ९०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित असून नवीन FunTouch OS ओएसवर काम करेल.

iQOO Z10 5G ची किंमत किती असू शकते?

रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनची किंमत २०,००० ते ३०,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते. ही किंमत थोडी जास्त वाटते, कारण गेल्या वर्षी iQOO Z9 5G १९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. जर iQOO Z10 5G ची किंमत २५,००० रुपयांच्या आसपास राहिली, तर तो Neo 10R शी थेट स्पर्धा करेल.