सध्या भारतात काही वर्षांपासून स्मार्टफोनचे मार्केट खूप वाढले आहे. अनेक कंपन्या आपले नवनवीन स्मार्टफोन्सचे मॉडेल्स लॉन्च करत असतात. आजकाल स्मार्टफोन काळाची गरज बनली आहे. आपले काम पूर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून असते. काही अधिक फीचर्स असणारे स्मार्टफोन्स महागडे असतात त्यामुळे आपण ते खरेदी करू शकत नाही किंवा आपल्याला शक्य होत नाही. मात्र आज आपण बेस्ट फीचर्स असणारे स्मार्टफोन जे फक्त २५,००० रुपयांच्या आतमध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहात. तुमचे बजेट २५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास तुमच्यासाठी iQOO , मोटोरोला आणि लावा आणि वनप्लसचे काही स्मार्टफोन्स चांगला पर्याय ठरू शकतात. त्याबद्दल जाणून घेऊयात.
iQOO Z7 Pro
iQOO Z7 Pro हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी ७२०० ५जी च्या स्पोर्टसह येतो. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा Aura लाइट OIS कॅमेरा मिळणार आहे. तसेच १२० Hz AMOLED डिस्प्लेसह येणार हा फोन वजनाला खूप जाड नसून, हा फोन AG ग्लास फिनिशसह येतो. फोनमध्ये आऊट ऑफ बॉक्सिंग अँड्रॉइड १३ वर आधारित फनटच OS १३ देण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये १.०७ अब्ज रंगाच्या सपोर्टसह ६.७८ इंचाचा AMOLED कर्व्ह डिस्प्ले मिळतो. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. तसेच सुरक्षेसाठी यात Schott Xensation UP ग्लास मिळणार आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रूपये आहे. तर २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे.
Motorola Edge 40 Neo 5G
मोटोरोला ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. ज्यात ग्राहकांना नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स कंपनी ऑफर करते. मोटोरोला कंपनीने भारतात Edge 40 Neo स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Edge 40 या नंतरचा हा सिरीजमधील दुसरा स्मार्टफोन आहे. Moto Edge 40 Neo हा या सिरीजमधील परवडणारा स्मार्टफोन आहे. मोटोरोला एज ४० निओ या स्मार्टफोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा pOLED डिस्प्ले मिळणार आहे. तसेच या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १४४Hz इतका असणार आहे. तसेच डिस्प्लेचा सॅम्पलिंग रेट हा ३६० Hz इतका असणार आहे. हा डिस्प्ले कर्व्ह डिस्प्ले असून त्याचा पीक ब्राइटनेस हा १३०० नीट्स इतका आहे. मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०३० प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे . या चिपसेटसह लॉन्च होणार हा पहिला स्मार्टफोन आहे. वापरकर्ते हा फोन Caneel Bay, Black Beauty अणि Soothing Sea या तीन रंगामध्ये खरेदी करू शकतात. Moto Edge 40 Neo च्या ८/१२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे.
Lava Agni 2 5G
Lava ही देशातील मोबाइल उत्पादक कंपनी आहे. Lava ने आपला नवीन स्मार्टफोन Lava Agni 2 5G भारतात लॉन्च केला आहे. Lava च्या या फोनमध्ये तुम्हाला ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफरेश रेट हा १२० Hz इतका आहे. या फोनचा डिस्प्ले AMOLED असणार आहे. याबाबतचा एक टीझर जारी केला आहे. त्यामध्ये याचा डिस्प्ले हा कर्व्ह आहे. Lava च्या या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इतके स्टोरेज तुम्हाला मिळणार आहे. याशिवाय यामध्ये तुम्हाला ५००० mAh ची बॅटरी आणि ४४ w चे वायरचे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तसेच फोनमध्ये टाइप-सी चा सपोर्ट मिळेल. याशिवाय या लावा फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर मिळणार आहे. Lava Agni 2 5G हा स्मार्टफोनची किंमत कंपनीने २१,९९९ रुपये ठेवली आहे.
OnePlus Nord CE 3 Lite 5G
OnePlus कंपनीने नुकताच आपला OnePlus Nord CE 3 Lite 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केला आहे. OnePlus Nord CE 3 Lite या फोनमध्ये वापरकर्त्यांना यामध्ये एलसीडी डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १८०० २४०० पिक्सेल इतका असणार आहे. OnePlus Nord CE 3 Lite ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर मिळणार आहे. वापरकर्त्यांना यामध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि त्याला ६७W चे SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. या फोनचे एकूण वजन हे १९५ ग्रॅम इतके असणार आहे. नेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, ब्लूटूथ 5.1, Wi-Fi, GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट असे फिचर मिळणार आहेत. OnePlus Nord CE 3 Lite 5G या फोनमधील ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन तुम्ही Chromatic Gray आणि Pastel Lime या रंगांमध्ये खरेदी करू शकता.