IRCTC Website Down : भारतीय रेल्वेचे ई-तिकीटिंग प्लॅटफॉर्म, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ऑनलाइन वेबसाइट आणि मोबाइल ॲप गुरुवारी (२६ डिसेंबर) अचानक ठप्प झाले आहे. ज्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, देखभाल कार्यासाठी म्हणजेच मेंटनेंस अॅक्टिव्हिटीमुळे सध्या आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि अॅप बंद ठेवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

IRCTC वेबसाइटवर लिहिलेल्या अधिसूचनेनुसार, ‘देखभालीच्या कामामुळे, सध्या ई-तिकीटिंग सेवा उपलब्ध होणार नाही. कृपया नंतर प्रयत्न करा.’ येथे दिलेल्या माहितीनुसार, ‘तिकीट रद्द करण्यासाठी/टीडीआरसाठी कृपया कस्टमर केअर नंबर 14646, 08044647999 आणि 08035734999 वर कॉल करा किंवा etickets@irctc.co.in’ वर मेल करा.

आयआरसीटीसीने तत्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी १० अशी केली आहे. तर स्लीपर क्लाससाठी तत्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी ११ वाजता केली आहे. पण आज (२६ डिसेंबर) आयआरसीटीसीचे सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म ठप्प झाल्यामुळे देशभरातील लाखो लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याआधी ९ डिसेंबरलाही आयआरसीटीसीची वेबसाईट तासाभरासाठी बंद करण्यात आली होती. याचे कारणही ई-तिकीटिंग प्लॅटफॉर्म देखभालीच्या कामासाठी असे करत असल्याचे सांगितले होते. पण आजही अशाप्रकारची अडचणी निर्माण झाल्याने तत्काळ तिकीट काढण्याचा प्रयत्न करणारे प्रवासी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. अनेकां प्रवाशांनी एक्सवर आपला तीव्र रोष व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc down today why there is an outage at indian railways ticket booking site sjr